पेपरलेस नाही पण लेस-पेपर !
सरकारी कामात कागदी घोडे नाचवणेच जास्त्र, साहजिकच पेपरचा वापर पण प्रचंड, अनेकदा अनावश्यक. साधा रजेचा अर्ज पण हातभर लांबीचा ! परत त्याच्या किमान ६ कॉप्या ! त्या दिल्या घेतल्याचे रेकॉर्ड ! जिकडे जावे तिकडे पेपर-पेपर आणि पेपर ! संगणकीकरण झाले पण लेखी रीपोर्टच्या ऐवजी छापिल रीपोर्ट निघू लागले. अनावश्यक प्रती निघू लागल्या, त्या बरोबरच अनावश्यक माहीतीचा फापट-पसारा वाढू लागला. जहाजाच्या outturn report च्या ४ प्रती निघायच्या, एक एजंटला, एक कस्टमला, एक डेप्युटी कार्यालयात, एक स्थळप्रत. डेप्युटी कार्यालयाची प्रत मी आधी बंद केली. मग एजंटसना त्यांचे email address द्यायला सांगितले. त्यांची प्रत त्यांना email ने मिळू लागली. पोस्टज चा खर्च वाचला, वेळ वाचला. साहजिकच एजंट खूष झाले. मग मोर्चा वळविला कस्टम कडे. पण या साठी सर्व प्रयत्न वरीष्ठ पातळीवरून करायला लागले. बराच पत्र व्यवहार झाल्यावर एकदाचे हे ही काम झाले ! मग आतल्या पसार्याकडे वळलो. इतर युजरना दिलेले print option बंद केले. त्यांना जे हवे ते पडद्यावर view करायची सवय लावली. सर्वात जास्त पेपरचा वापर व्हायचा 'न सोडविलेल्या' मालाची यादी करण्यात. ही यादी, आयटमवाईज ,जिकडे माल पडलेला असेल तिकडे बनायची. तिच्या ४ प्रती बनायच्या, विभागीय अधिकार्यामार्फत ती CDO पर्यंत यायलाच आठवडा लागायचा ! एवढ्या दिवसात आयातदार तो माल सोडवून घ्यायचा ! पेपर वाया जायचाच पण गोंधळ ही वाढायचा ! अशा आयातदाराला नोटीस पाठवायचा अकारण खर्च यायचा. न सोडविलेल्या मालाची यादी 'विक्री विभागाकडे' पाठवायला लागायची. त्यांची system , fox मधे असल्यामुळे तिकडे त्यांना data entry करायला लागायची. मी परत कामाला लागलो. सगळया व्यवस्थेचा अभ्यास करून ही सर्व पद्धत सुटसूटीत व पेपरलेस केली. न सोडविलेल्या मालाची यादी online बनू लागली. CDO मधे ती दुसत्याच दिवशी update होउ लागली. अशा मालाची माहीती 'विक्री विभगाकडे ' flat file च्या स्वरूपात जाउ लागली. त्यांचीही डोकेदुखी बंद झाली. लगे हात, आयातदारांना पाठवायच्या नोटीसापण संगणकातुन निघु लागल्या, मधल्या काळात जर माल सोडविला गेला असेल तर नोटीस निघणार नाही असाही check टाकून घेतला. हे सर्व काम मी अगदी एक हाती केले ! पुन्हा प्रचंड यशाचा धनी झालो. उदंड कौतुक झाले. पेपर चा वापर खूपच कमी झाला ! साधारण १,००,००० (दर वर्षी )पेपर या प्रयत्नाने वाचले ! आमचा दूसरा विभाग बंदराच्या वापरदारांना vessel list द्यायचा ! यात बंदरात सध्या उभ्या असलेल्या बोटी, त्यांचे काम कधी संपणार याचा अंदाज, पुढच्या २४ तासात, येणार्या जाणार्या बोटी, पुढच्या काही दिवसात येणार्या बोटी व येउ घातलेल्या बोटी अशी माहीती असायची. पाठपोठ ८ ते १० पाने ही यादी असायची ! याच्या ५०० प्रती लागायच्या ! त्या करीता एक स्वतत्र zerox machine होते ! त्या विभागाला पण email चा कानमंत्र दिला. ही यादी आता एजंटना pdf मधे मिळू लागली, ती सुद्धा त्याच दिवशी ३ च्या आत, बसल्याजागी !एरवी त्यांना ती संध्याकाळी ६ च्या पुढे किंवा दूसर्या दिवशी सकाळी मिळायची ! आता या vessel list च्या फक्त २० प्रती निघतात ! (त्या तरी का ? can't help !)
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, २७ जून, २००८
पेपरलेस नाही पण लेस-पेपर !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा