शुक्रवार, २७ जून, २००८

सू-सूत्रिकरण !

सू-सूत्रिकरण !
प्रत्येक खाते व त्यातला पुन्हा विभाग आपल्या आपल्या गरजेप्रमाणे व वकुबाप्रमाणे संगणकीकरण करत होता. पण यात समन्वय कोठेच नव्हता ! कॉमन माहीतीची देवाण घेवाण अशक्य होते किंवा flat file चा सव्यापसव्य करायला लागायचा ! सुट्या मालाची हाताळणी बघणारा आमच्या विभागात, तसेच पगार पत्रक विभागात cobol चालायचे. कंटेनर विभाग ingress, हेजेरी-पत्रक integra, vessel list साठी Dbase, विक्री विभागात fox असा सगळा सर्व धर्म समभाव होता ! २००१ सालात या सर्वाचे सू-सूत्रिकरण करण्याचा निर्णय घेतला गेला. तेव्हाची CMC ही सरकारी कंपनी (आता टाटा च्या मालकीची आहे) या कामाला लागली. ऑरँकल वापरून ते हे सर्व काम करणार होते. प्रत्येक विभागाचा एक core group स्थापन करून त्यांच्या दीमतीला दिला गेला. मी गोदी विभागाकडून होतो. आधीच्या सिस्टीम मधे काम करताना अनेक त्रूटी मला जाणवल्या होत्या पण cobol ही बदलासाठी तशी लवचिक नाहीच आहे, तेव्हा काही करता येत नव्हते. ही एक सुसंधीच होती ! CMC चे ही काम सोपे झाले ! त्यांना आमच्या गरजेप्रमाणे फक्त कोडींगच करायचे होते. cargo व container module सर्वात आधी release पण झाली ! पण अनेक तांत्रिक समस्यांनी (network related) ती अजूनही ग्रासलेली आहे. या प्रणालीला नाव दिले गेले IPOS (Integrated Port Operations System). या नंतर या विभागातील माझा अवतार संपल्यातच जमा होता ! आमच्याकडे काहीच काम उरले नाही. मग ज्या विभागात संगणकीकरण पाठी पडले आहे तिथे माझी बदली झाली. त्यातही मी माझ्या कामाची छाप उअमटवलीच पण १०० % मिळाले नाही. नंतर कामगारांचा पगार व हजेरी नोंदवणार्या संगणक विभागात माझी बदली झाली. तिथले प्रोग्रँम वापरले जा होते पण सुधारणांना भरपूरच वाव होता. जसे जसे सूचत गेले तशा आवश्यक सुधारणा मी करून घेतल्या व तिकडचा work load बराच कमी केला !सध्या मी अकरा मुख्य बंदरे संयुक्त रीत्या राबवत असलेल्या प्रकल्पावर काम करीत आहे. PCS ( Port Community System) , यात बंदर व्यवस्थापन्, एजंट याच्यामधले कागदोपत्री चालणारे काम on line होणार आहे. वेळेची बचत व व्यवहारात पारदर्शकता यातून साध्य होणार आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: