धरसोड वृत्ती अंगात भिनली असूनही एवढी वर्षे मी एकच गोष्ट नित्य नेमाने, इमाने-ईतबारे करत आलोय ती म्हणजे सल्ला देणे, तोही न विचारता , अगदी फूकट (विकत घेणार कोण ? इति सौ.) माझा सल्ला कोणी मनावर घेत नाही म्हणून का मी सल्ला देणे थांबवू ? आजच्या style प्रमाणे या topic मधे मी तुम्हाला अनेक अनाहूत सल्ले देणार आहे, पण चूकून जर माझा सल्ला कोणी ऐकला, चूकून त्याचे काही भले झालेच तर तो निव्वळ योगायोग समजावा ! एकदा फायदा झाला म्हणजे पुन्हा होईलच असेच काही नाही !(संदर्भ :- past performance is not ---)अर्थात माझ्या सारखीच खोड (खाज !) ज्यांना आहेत ते याच topic मधे आपले ही सल्ले घुसडू शकतात !
१) credit card वर खरेदी करताना billing cycle लक्षात ठेवावे, समजा ते १० तारखेपर्यंत असेल तर खरेदी ११ ते १५ या काळात करावी म्हणजे पूर्ण ५० ते १०० दिवसाचे credit enjoy करता येते.
२) संगणकावर काम करताना विविध accounts साठी शक्यतो एकच user id व password वापरावा ! लक्षात ठेवायला सोपे पडते. पासवर्ड लक्षात ठेवायला सोपा पण ईतरांना सहज decode करता येउ नये म्हणून आपली आद्याक्षरे, जन्मगाव, शहराचे नाव व पोस्टल नंबर, जन्म तारीख यांचा मस्त combination बनवावे. आपल्य आवडत्या गाण्याचे वा चित्रपटाची आद्याक्षरे घेउन ही मस्त password घेता येतो !
३) कोणाला पैसे द्यायचे असतील तर चेक ने द्यावे, शक्यतो post dated, शनिवार रविवारचा विचार करून, घ्यायचे असतील तर रोकडाच घ्यावा !
४) जगात बायको आणि मुले सोडून जे जे काही भाड्याने मिळते ते जरूर घ्यावे, hire and fire ! 'मुर्ख लोक घरे बांधतात शहाणी त्यात भाडेकरू म्हणून राहतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
५) बाजार कोसळत असताना सरकात तो का कोसळत आहे म्हणून कमिटी नेमते तेव्हा समभाग विकत घ्यावेत ! आणि बाजार चढतआ असताना shares मधेले ज्याला झ्य्-- की फाटा कळत नाही तो जेव्हा पैसे गुंतवायला येतो तेव्हा ते आपण विकून मोक़ळे व्हावे !
६) विमा घेताना तरूण मंडळीनी term insurance चाच विचार करावा.
७) ECS चा पर्याय उपलब्ध असताना ही रांगेत उभे राहणार्या माणसांची मला किव येते.
८) debit card वापरणे ही शहाणपणाचे नाही. कुठलाही extra charge नसेल तर credit card च उत्तम !
९) ८ ते ९ % व्याजासाठी vpf किंवा ppf मधे पैसे गुंतवण्यापेक्षा, ELSS + SIP हे combination best !
कर बचत + १५ ते २५%(अधिक) परतावा तुम्हाला मिळेलच !
१०) electronic वस्तु रोखीने घ्यायची असल्यास, परीसरातल्या निदान ५ दूकानांत फिरावे. एखादे model नक्की करून दूकानाचे नाव व तो देत असलेली किंमत त्याच्या समोरच एका कागदावर लिहून घ्यावी ! lowest offered price पेक्षा तुमचे निदान ५०० रूपये तरी वाचतील !
११) एखादी गोष्ट विकत घेण्यापुर्वी ती कोठे फूकट मिळत नाही ना याची आधी खात्री करावी ! सल्ल्यासाठी मी आहेच !
१२) सहलीला जाताना आपल्या आपणच जा, स्वस्त पडतेच पण planning करताना वेगळीच मजा येते ! दोन familiy असतील तर सुमो किंवा क्वालीस बूक केल्यास छान सोय होते.
१३) स्वस्त की महाग हा विचार न करता "रास्त" विचार करा.
१४) furniture तयारच घ्या ! बनवुन खूप महाग पडतेच पण विकताना भंगाराची किंमत मिळ्ते !
१५) फूटपाथ वर दूकाने थाटणारे, फेरीवाले यांना अजिबात थारा देउ नको !
कोणतीही गोष्ट फूकट देउ नका ! तिची किंमत वाटत नाही ! अगदी सल्ला सुद्धा !
शक्य असेल तेव्हा पाई, नसेल तर सायकल वापरा, पेट्रोल तर वाचेलच व्यायाम सुद्धा होईल, प्रदूषणाला ही 'पाय'बंद बसेल !
सहलीला जाताना आपल्याला उचलता येइल एवढेच , हमाल करावा लागणार नाही, ईतकेच सामान घ्या म्हणजे अडवणुक होणार नाही.
सहलीत खरेदी उरकू नका. believe me, तुम्ही मुंबई-पुण्याचे असाल तर तीच वस्तू तुमच्या शहरातपण त्याच किंमतीला मिळते.
जुनी कागदपत्रे , बिले फाडून टाकताना ती जाळणेच चांगले, किंवा त्याचे पार कपटे करा. अशा कचत्यातल्या बिलांचा वापर बोगस फोन किंवा credit card काढव्यासाठी होतो व नसता मन:स्ताप पाठी पडतो.
मित्र कर्ज मागत असेल तर निव्वळ मैत्री तुटेल म्हणून त्याला कर्ज देउ नका. कारण पैसेही बुडतील व मैत्रीही तुटेल !
कोणालाही जामीन राहू नका, नाहीतर त्याच्याकडून cross surety घ्या !
भीड ही भिकेचा जननी आहे याचे कायम स्मरण ठेवा. (हे मला कधी जमेल ?)
घर घेताना ;
१) always go for ready possession.
2) सदनिका घेताना लहान ईमारतीत घेण्यापेक्षा मोठे निवासी संकूल चांगले. देखभाल खर्च विभागला जातो. जास्त सुरक्षितता, नाविन्यपूर्ण प्रकल्प जसे solar heater, solar lighting, wind generator, video phone, rain water harvesting कमी खर्चात राबविता येतात. parking ची समस्या भेडसावत नाही. मोठ्या संकूलात सुरक्षा चौकी, त्यांच्या रहाण्यासाठी वेगळी जागा, सभासदांसाठी community centre/hall या सोयी पुरवायला बिल्डरला पण परवडते.
३) शक्यतो lift असलेल्या ईमारती टाळा, विनाकारण देखभाल शूल्काचा बोजा वाढतो.
४) resindential cum commercial complex पेक्षा १००% निवासी संकूल चांगले.
घराचे घरपण टिकवायचे असेल तर "७ च्या आत घरात" ला पर्याय नाही !
निदान रात्रीचे जेवण तरी कुटूंबातील सर्वानी एकत्र बसून घ्यावे.
संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना, स्त्रोत्र पठण, शुभं-करोती साठी १० मिनीटेही पुरतात, तेवढा वेळ तरी काढाच.
मुलांना मारझोड करून ती कोडगी होतात व त्याने कोणतेही प्रश्न सूटत नाहीत.
मुलांच्या मित्रांची पुर्ण माहीती करून घ्या व त्यांच्या पालकांच्याही संपर्कात रहा.
मुलांच्या वर्ग शिक्षकांच्या नियमित संपर्कात रहा.
मुलांना व्यायामाची आवड जाणीवपुर्वक लावा. शाळेत जाण्यासाठी त्यांना सायकलवरून जाण्यासाठी प्रोत्साहन द्या.
घरातली कोणतीही वस्तू हाताळायची त्यांना पूर्ण मुभा द्या. रोज लागणारे पैसे कधीही कड्या-कुलपात ठेउ नका, त्यांची जागा मुलांना माहीती असू द्या.
मुलांच्या मित्रांना पण चांगली वागणूक द्या. घराच्या आसपासची कामे जसे बँक, पोस्ट या ठिकाणी जाताना मुलांना बरोबर न्या. अनेक व्यवहार ती आपसूकच शिकतात.
लग्न झाल्यावर आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची बायकोला / जोडीदाराला पूर्ण कल्पना द्या.
आपली सर्व खाती either or survivor अशी बदलून घ्या. शक्य नसेल तिथे बायकोचे जोडीदाराचे नाव nominee म्हणून नोंदवा. नवीन खाती व घर खरेदी संयक्त/ 'कोणीही एक 'सुविधेनेच उघडा/ घ्या .
excel चा वापर करून financial status report बनवुन ठेवा व तो नियमित update करा, तसेच तो शेवटचा कधी update केला ते पण लिहून ठेवा. याचीही जोडीदाराला पूर्ण कल्पना द्या. त्याची एक copy स्वत:ला email करा व एखाद्या folder मधे save करून ठेवा.
कोणतीही तक्रार लेखीच करा. तक्रारीची पोचपावती जरूर घ्या. अनेक वेळा आपण लेखी तक्रार देत आहोत असे दिसताच आपले काम मार्गी लागते !
usually एखाद्या सरकारी कार्यालयात दिसेल त्याच्याकडे आपण चौकशी करत सूट्तो आणि "खांब खांब खांबोली"चा खेळ खेळत बसतो. त्या ऐवजी त्या कार्यालयाचा जो प्रमुख असेल त्याच्याच केबिन मधे बेधडक घूसा !
घरी landline ठेवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखेच आहे. मुंबईत mtml २५० रु. महीना भाडे घेते व ६० काँल मोफत देते, म्हणजे per local call तुम्ही ४ रू. मोजता. त्याहुन अनेक मोबाईल कंपन्या (trump, excel) सुद्धा life plan scheme मधे तुम्ही १ रु. भारतामधे कोठेही बोलू शकता ! शिवाय दोन नंबर दरम्यान तुम्ही unlimited time बोलू शकता, ते ही विनामूल्य किंवा १० ते १५ पैशात !
मृत्यूपत्र (will)
साधारण चाळीशी गाठली की आपले मृत्यूपत्र करून ठेवायला काही हरकत नाही. साधारण या वयात आपण आपल्या नोकरी धंद्यात बर्यापैकी स्थिरावलेले असतो, जबाबदार्या नक्की झालेल्या असतात. मृत्यूपत्र करायला १ पैचाही खर्च होत नाही. कोर्या कागदावर आपल्या पाठी आपल्या संपत्तिचे वाटप कसे करावे हे लिहून ठेवावे. त्याच्यावर आपल्या दोन जवळच्या मित्रांच्या सह्या घ्याव्यात. आपल्या गुंतवणुकीचे एक statement त्याला जोडून ठेवावे व ते सीलबंद करून जोडीदाराला सांगून ठेवावे. निव्वळ मृत्यूपत्र न केल्याने संपत्तिच्या वाटपात अनेक अडचणी येतात, बराच वेळ लागतो (किमान १ वर्ष ), खर्च ही करावा लागतो व ज्यांच्या साठी आपण हे सर्व मिळवले त्यांची अकारण फरफट होते. तसेच मृत्यूपत्राने हस्तांतरीत होणार्या मालमत्तेला stamp duty लागत नाही हi केवढा फायदा आहे ! अधिक खात्रीसाठी मृत्यूपत्र कोर्टात नोंदणीकृत करता येते पण मग त्याला खर्च येतो. तेव्हा हा सल्ला नक्की ऐका, घरी एकदा काय ती रडारड होईल पण तुम्ही गेल्यावर तुमच्या फोटोला चंदनाचा हार नक्की घातला जाईल !
प्लास्टीकच्या अतिवापराचे दुष्परीणाम अनुभवुनही आपण शहाणे काही होत नाही. पण आपल्यापुरते तरी सुधारायला काय हरकत आहे ? बाहेर जाताना कापडी किंवा ज्यूट ची पिशवी बरोबर घ्या. दूकानदाराने प्लास्टीकची पिशवी दिली तरी आपली पिशवी पुढे करा ! त्यात कमीपणा वाटण्यासारखे आहेच काय ?
शेयर बाजारातुन खरेदी विक्री करण्यासाठी online trading account उघडणे चांगले. थोडे महाग पडते पण सोयीचे. कारण हल्ली सौदे T+1 या प्रकारे होतात. तुम्ही जर समभाग विकले असतील तर तुम्हाला delivery पण त्याच दिवशी द्यावी लागते. ते शक्य न झाल्यास auction होउन 'लेने के देने' पडते. broker च्या tips वर आंधळा विश्वास ठेउ नका. bseindia.com किंवा nseindia.com या साईटस वर जाउन कंपनीची संपूर्ण माहीती काढा, जसे promoter holding, average turnover, net delivery ratio, issued share capital and reserve fund, change in holding paatern over the 1 year period etc.
शक्यतो A गटा मधल्याच कंपन्या चांगल्या कारण कामगिरी चांगली असणार्याच कंपन्या या गटात असतात. कंपनी पाठची ३ वर्षे तरी फायद्यात हवी व लाभांश जाहीर करणारी असावी. कंपनी घेण्यापुर्वी आताची किंमत लाभांश, हक्क, बोनस या लाभांसहीत आहे की देउन झाल्यावर त्याची माहीती पण जरूर करून घ्या.
शेयर मधली गुंतवणुक म्हणजे झटपट डबल फायदा असा विचार करू नका. "जास्त जोखीम- जास्त फायदा" हा नियम लक्षात घ्या. ३ महीने ते १ वर्ष या काळासाठी गुंतवणुक करा.
सध्या शेयर बाजार कोसळला आहे आणि blue chips कंपन्या घ्यायची हीच चांगली संधी आहे ! so grab it !
पुढच्या दोन ते तीन महीन्यात कंपन्याचे वार्षिक निकाल जाहीर व्हायला लागतील व चांगली कामगिरी करणार्या कंपन्या 'भाव' खाउन जातील !
cyber cafe मधून काम संपल्यावर tools > internet options > delete cokies/fiels/settings न विसरता कराच.
पासवर्ड किंवा युजरनेम सेव करायचा आँप्शन कधीही येस करू नका !
पासवर्ड कोठेही लिहुन ठेवू नका, तो डोक्यात फीट करा !
पब्लीक फोन वरून काँल करून झाल्यावर कोणताही एक नंबर फिरवून रीसीव्हर खाली ठेवा म्हणजे तुमच्या मागाहुन येणारा redial करून तुमचा नंबर परत dial करू शकणार नाही.
अनोळखी माणसाला तुमच्या नावावर असणारे सिमकार्ड वापरायला देणे धोक्याचे आहे.
handset दूसर्याला विकला असेल तर सर्व contacts आधी delete करा.
पैशाची किंमत मुलांना कशी कळेल ? होत काय की बर्यापैकी आर्थिक स्थिती असलेले पालक मुलांचे बहुतेक हट्ट ताबडतोब पुरवतात. त्यामुळे मुलांना पैसा अगदी सहज मिळतो असे वाटते. माझ्या मुलाला एकदा शाळेतुन काही निधी गोळा करण्यासाठी कूपन दिली होती. १ रू. ची २० कूपन्स होती. सौ. चे मत पडले की त्याला २० रू देउन टाका. कोठे सगळीकडे हिंडत बसणार तो ! मी विचार केला आपल्याच ईमारतीत २० तरी घरे आहेत, बहुतेक आपल्याला ओळखतात, मुलाने एक अनुभव म्हणून सगळ्यांच्या घरी जावे असे ठरवले. दोन तासाने मुलगा रडवेला होउन घरी आला. म्हणाला, बाबा कमाल आहे, १ रूपया द्यायला एवढी टंगळमंगळ लोक करतात ? बाबा घरी नाहीत, संध्याकाळी पैसे देत नाही, सूटे पैसे नाहीत, आत्ताच एकाला दिले अशी उत्तरे त्याला मिळाली. काही घरांत तर आत घेण्याचेही सौजन्य दिसले नाही, काहींनी तर कूपन हातात बघून धाडकन दार लावून घेतले ! मुलाला पैशाचा फंडा कळला होता ! माझ हेतू बर्याच प्रमाणात सफल झाला !
व्यवहाराला चोख म्हणजे काय ते मला माझ्या आजोबांकडून कळले. आंब्याच्या दलालांकडून वसूली करण्यासाठी ते जून महीन्याच्या अखेरीला मुंबईला आमच्या कडे यायचे. मी तेव्हा काँलेजला असेन. त्यांच्या बरोबर मी सगळीकडे फिरायचो. प्रत्येक दलालाकडून येणे असलेली रक्कम त्यांनी अगदी रूपया पैशात काढलेली असायची. no rounding ! दलालाच्या घरी जाताना त्याच्या मुलाला खाउ घेउन जायचे. एकदा असेच एकाकडून १२३४-३५ पैसे येणे होते. त्याने १२३४ रूपये दिले. आजोबा बोलले वरचे ३५ पैसे द्या ! त्याने सरळ रूपयाच दिला व घ्या ठेउन सुटे बोलला. आजोबा ताडकन म्हणाले, भीक मागत नाही आहे, व्यवहार म्हणजे व्यवहार, हे घे तुझे ६५ पैसे परत ! घामाचे पैसे आहेत, त्यातली प्रत्येक पै मला मोलाची आहे !
स्वदेशी, amway या व (multi leval marketing, network marketing ही नवी गोंडस नावे )यारख्या योजना असणार्या कंपन्यांच्या एजंटाना लाथ मारून हाकलून द्या ! यांचा फंडा एकच आहे, तुम्ही आधी फसा व मग तुमची मान सोडवण्यासाठी दोन अजून बकरे आम्हाला मिळवून द्या ! अनेक वर्षे अशा योजनेत लोक पैसे बुडवत आहेत.झटपट पैसे मिळवण्यासाठी माणूस कसा वेडा होतो नाही ? share holiday हा प्रकार ही फसवणुकच आहे. आपण फसलो असे एकदा कळले की निदान ईतरांना सावध करा. माऊतीच्या बेंबीत बोट घालून विंचू चावल्यावर सुद्धा 'गार वाटतय' असे सांगायची मानसिकता आता तरी बदला !
कँमेरा घेताना digital च घ्या आता ! रोल टाकायचा कँमेरा आता इतिहासजमाच होणार आहे. साधारण ४ x ६ ची print घ्यायची असल्यास ३ mp चा कँमेराही पुरेसा आहे. आता किमतीही खूप उतरल्या आहेत.
while sending attachment/s with email, zip all files in one single zip file. This will reduce sending time, convenient for receiver also ! one more thing is ,you can passwsord protect that zip file.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा