नोकरी जायचे प्रसंग !
गोदी विभागात काम करताना दूसर्यावर विश्वास हा ठेवावाच लागतो पण विश्वासघात करणारे पण तुम्हाला भेटतातच. निव्वळ नशीब चांगले असेल आणि पुर्व-चरीत्र चांगले असेल तरच तुम्ही यातुन सूटू शकता, अन्यथा तुरूंगात पण रवानगी होउ शकते !आमच्या अनेक कामांपैकी एक जोखमीचे काम म्हणजे शेड मध्ये पडून असलेला माल गोदामात हलविणे. यात जराही हयगय चालत नाही. गाडी भरताना समोर उभे राहून मालाची सद्यस्थिती, मोजदाद करून loading sheet बनवायची असते. त्या गाडीबरोबर escort म्हणून जावे लागते. गोदामात तो माल खाली झाला की मगच सूटका होते. अशाच एका आधी केलेल्या कामाच्या संदर्भात चौकशीकरता मला बोलावले गेले. loading sheet दाखवून सही माझीच आहे का विचारले गेले. सही माझीच होती. ball bearing चे काही खोके मी warehouse केले होते. त्याच्यावर मी remark पास केला होता "REPACKED AFTER CUSTOM EXAMINATION". शेडच्या कारकूनाच्या सांगण्यावरून मी तो remark लिहीला होता पण त्याने मला सरळ सरळ फसवले होते. मी खरतर custom forwarding register बघून त्याची खातरजमा करायला हवी होती. आयातदारचा एजंट जेव्हा माल सोडवायला आला तेव्हा त्याला त्या खोक्यात कमी माल आढळला. आता तो पोलीस तक्रार करणार होता आणि मी चांगलाच अडकणार होतो. मी यात निर्दोष आहे अशी खात्री असलेल्या एकाने एजंटाला तक्रार न करता माल सोडवायला सांगितले. साधारण १५ दिवस बरीच भवती न भवती होउन तो माल तक्रार न करता सोडवला गेला व माझा जीव भांड्यात पडला !असेच एकदा warehousing ची गाडी भरून झाल्यावर मी loading sheet बनवायला घेतली होती. त्याचवेळी शेडचा निरीक्षक सांगू लागला की अजून एक जड पेटार तुझ्या गाडीत भरला आहे तेव्हा त्याची पण नोंद कर. मला आश्चर्य वाटले कारण गाडी escort समोरच भरायची असते. मी विचारले आत काय आहे ? माहीत नाही ! पेटीवर मार्क काय आहे ? ताज महाल हॉटेल ! मला वेगळीच शंका आली. नक्की आता दारूचे क्रेट असणार आणि ते सुद्धा या लोकांनी फोडून चोरले असणार ! मी ठामपणे सांगितले मला पेटी बघायची आहे. शेडचा स्टाफ सांगू लागला की पेटी जड आहे, ती आता खाली काढता येणार नाही व आता आपल्याकडे fork lift पण नाही. आमच्यावर विश्वास ठेव, गडबड काहीही नाही. पण मी हट्टाने गाडीवर चढलो. त्या पेटीला एका बाजूने भगदाड पाडून आतला काही माल लंपास केला होता ! मी सांगितले मी damaged , content exposed चा remark घेउनच warehousing करीन ! त्यांनी झक मारत ती पेटी खाली उतरवली. जर मला हे कळलेच नसते तर माझ्यावरच भलता आळ आल असता.कधी कधी दूसर्याला वाचवायच्या नादात आपणच गोत्यात कसे येतो त्याचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. तिसर्या पाळीत माझ्यासमोर जहाजातून रेल्वे रूळ उतरवले जात होते. अंधूक प्रकाश व जहाज रिकामे होत आल्यामुळे बरेच वर आले होते, त्यामुळे रात्री ३ च्या सुमाराल एक sling निसटून जहाज व धक्का यांच्या मधल्या पोकळीत पडले. मोठा आवाज झाला व झोपलेला सगळा सुपरवायजरी स्टाफ धक्क्यावर आला. याचा त्यांना जाब द्यावा लागला असता पण सर्वानुमते हे प्रकरण दाबून टाकायचे ठरले. मी पण गप्प राहीलो. ५ दिवसांनी जिकडे हा प्रकार घडला त्याच्या प्रमुखाने मला तातडीने चौकशीकरता बोलवून घेतले. त्याच्या केबिनच्या बाहेर सर्व 'संबंधित' मंडळी गंभीर चेहर्याने जमली होती. मी जर गळपटलो तर त्यांना ते भारी पडणार होते. आत शिरल्या शिरल्या साहेबाने मला विचारले की तुझा कोणता report करू ? कामावर असताना झोपा काढता म्हणून की रूळ पाण्यात पडून सुद्धा गप्प राहीलात म्हणून ? मी क्षणात सावरलो व ठामपणे सांगितले की तुमचा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' थाटाचा आरोप मला साफ अमान्य आहे. मी संपूर्ण shift जागा होतो, माझ्यासमोर, माझ्या shift मध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. dredging करून जर रूळ मिळाले तरी ते माझ्या shift मध्ये पडले असे कसे म्हणता येइल. तुम्ही ज्या surveyor च्या report वरून चौकशी करता आहेत त्याच्या वरची तारीख प्रसंग घडून गेल्यावर दोन दिवसानंतरची आहे. असे का ? माझा युक्तीवाद अगदी बिनतोड होता. पुढे मी हे ही सांगितले की मला लेखी मेमो द्या, मी हे सर्व लेखी द्यायला तयार आहे ! सूटलो ! सगळ्यांनी माझे अगदी मनापासून अभिनंदन केले पण त्या अधिकार्याने माझ्यावर अजूनही डूख धरलेला आहेच !
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, २७ जून, २००८
नोकरी जायचे प्रसंग !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा