१३४.३३ कोटी रूपयांचे वाटप कस करायचे ?
( निमित्त आहे १ एप्रिलचे !)
गेली अनेक वर्षे कट्ट्यांचे मालक आँर्कुट्च्या प्रचंड फायद्यामधला आपला रास्त वाटा मागत आहेत. या दबावाला झूकून फायद्याच्या ४% वाटा कट्ट्याच्या मालकांना मिळणार आहे. तो त्यांनी सभासदांना द्यावा असे अभिप्रेत आहे. १०,००० च्या वर सभासद संख्या असलेल्या आपल्या कट्ट्याला कमीत कमी १३४.३३ कोटी रूपये मिळणार आहेत. ही बातमी मला कळल्यावर हल्ली मालकांच्या वाढत्या उद्दामपणाचे रहस्य मला कळले. ३० एप्रिल या सभासद निश्चिती तारखेच्या आत जमेल त्या सभासदाला हाकलून आपला वाटा वाढवायचा त्याचा डाव आहे, तो आपण हाणून पाडला पाहीजे. स्वत:हुन unjoin तर कोणीही होउ नये. लगोलाग मी मालक आदी जोशी यांचे घर गाठले. रात्रीचे १ वाजले तरी आदीच्या घराचा दिवा चालूच असल्यामुळे मला घर लगेच सापडले ! त्याने आधी मला ओळख दिली नाही पण मी माझ्या उडवलेल्या टाँपिकची नावे सांगितल्यावर त्याचा नाईलाज झाला ! द्ळण न दळता एवढे करोडो रूपये कसे वाटणार ते सांग असे खडसाविले. कसले पैसे, कोणते पैसे हे प्रश्न पण मी कात्रण समोर ठेवताच उडून गेले ! आदीने मला on the spot एक खोका देउ केला मी म्हटले जातिशी गद्दारी करणार नाही ! (५०-५० केले असते तर ? )तेव्हा आदीने दूसरा (डाव) टाकला ! म्हणाला, ठीक आहे टाँपिक काका, उद्या हाच टाँपिक टाका, सभासदांच्या सूचना मागवा, यावर जर एकमत झाले तर त्याप्रमाणे मी वागायला तयार आहे ! पण जर हा टांपिक भरकटला, त्याचा कँफे झाला तर मी एकही पै देणार नाही ! मी हे आव्हान स्वीकारले आहे ! तुम्ही ?
वाटप कसे करायचे याचे अनेक पर्याय आहेत, माझ्या मते ते असे,
१) एकूण रक्कम भागिले सभासद संख्या, हे सगळ्यात सोपे ! प्रत्येकी १ लाख मिळतील !
२) फक्त सक्रीय सभासदांमधे वाटप. टांपिक प्रमाणे काही रक्कम आणि पोस्टस साठी काही रक्क्म, फालतू, कँफे करणार्या पोस्ट जमेस धरायच्या नाहीत.
३) टाँपिक ला ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात त्याच्या निर्मात्याला वाटा. delete topic धरायचे नाहीत !
४) निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्यांना काही रक्कम व विजेत्यांना काही
5) जुन्या सभासदांना जास्त वाटा.
६) प्रक्षोभक भाषा वापरणार्यांना एक पैही देउ नये.
७) पैसे शेयर बाजारात गुंतवावेत व डबल करावेत.
८) एक विश्वस्त संस्था स्थापन करून ज्ञातीच्या भल्यासाठी पैसे खर्च करावेत.
९) सहली, मेजवान्या आयोजित करून त्यावर पैसे खर्च करावेत.
१०) सोडत काढून पैसे वाटावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा