संपूर्ण
वन डे कारकिर्दीत सचिन पहिल्याच चेंडूवर फक्त एकदाच बाद झालेला आहे !
452 निकाली सामन्यात सचिन
सरासरी 47 चेंडू खेळलेला आहे, या सामन्यांत संपूर्ण संघाचा डाव सरासरी 264 चेंडू चालला होता, म्हणजे संघाच्या
वाट्यातले एकूण 18 % चेंडू सचिन खेळला. संघाची सरासरी धावगती आहे 84 ( सरासरी धावसंख्या
आहे 227) तर सचिनची धावगती सुद्धा जवळपास
तेवढीच आहे.
1 ते 100 मधील फक्त या
व्यक्तिगत धावसंख्येवर सचिन एकदाही बाद वा नाबाद राहिला नाही –
56, 58, 59,
75, 76 ,92
0 ते 9 हे आकडे सचिनसाठी घातसंख्याच म्हणायला हव्यात
, 452 वेळा फलंदाजी करताना तब्बल 126 वेळा सचिनला दोन आकडी धावसंख्या गाठता आलेली
नाही !
धावा किती वेळा बाद झाला
0
|
20
|
1
|
20
|
2
|
18
|
3
|
11
|
4
|
14
|
5
|
9
|
6
|
10
|
7
|
9
|
8
|
11
|
9
|
4
|
एकूण 11 सामन्यात सचिनला फलंदाजी करायला मिळालीच नाही, त्यात 3 सामन्यात सचिनला
फलंदाजीसाठी यावेच लागले नाही कारण संघ आधीच विजयी झाला होता. 2 सामने सोडून
द्यावे लागले, तर 6 सामन्यात भारतीय संघालाच फलंदाजी करावी लागली नाही व सामना
निकाली झाला नाही.
बाद
होण्याचा प्रकार व तेव्हाची सरासरी,
68 वेळा सचिनचा त्रिफळा उडला, तेव्हाची त्याची सरासरी आहे 37.25
258 झेलबाद – सरासरी 34.70
39 वेळा पायचीत – सरासरी 32
34 वेळा धावबाद – सरासरी 46.80
11 वेळा यष्टीचीत – सरासरी 79
सचिनला जम बसवायला वेळ
लागतो पण एकदा का जम बसला की चेंडूस धाव
ही धावगती तो सहज राखतो. म्हणूनच सलामीला येवू लागल्यावरच त्याचा खेळ बहरला कारण
स्थिरावण्यासाठी त्याला वेळ मिळू शकला. हा घ्या पुरावा ;
20 वेळा सचिन शून्यावर बाद झाला आहे – अशा वेळी त्याने खाल्लेले चेंडू 86 आहेत.
49 शतके करतानाची
धावगती 100
96 अर्धशतकी खेळींच्या वेळची धावगती 94
1 ते 49 एवढी धावसंख्या असतानाची धावगती 68.67 .
कारकिर्दीतली धावगती 86
76 सामन्यात फलंदाजी
करताना सचिनला एकही चौकार वा षटकार मारता आला नाही.या 76 सामन्यात त्याने
धावा जमविल्या आहेत 301. सरासरी 3.96
सलग 25 सामन्यांचा एक
टप्पा विचारात घेतला तर सचिनची चेंडू सीमापार करून जमविलेल्या धावांची टक्केवारी(चौकार
किंवा षटकार ),धावगती (स्ट्राईक रेट ), सरासरी . संघाच्या एकूण धावातला सचिनचा
वाटा (टक्क्यात ) अनुक्रमे अशी आहे –
25
सामन्यांचे टप्पे
1 to 25
|
32.23
|
70.4554
|
26.4583
|
12.54
|
|
26 to 50
|
25.31
|
64.5308
|
33.7917
|
16.85
|
|
52 to 75
|
35.81
|
80.1146
|
26.625
|
12.87
|
|
76 to 100
|
55.56
|
79.3976
|
42.44
|
20.94
|
|
101 to 125
|
38.86
|
69.4996
|
48.68
|
23.12
|
|
126 to 150
|
45.04
|
73.3604
|
38.32
|
18.23
|
|
151 to 175
|
40.93
|
79.0045
|
28.8182
|
13.62
|
|
176 to 200
|
46.23
|
92.1892
|
56.25
|
25.32
|
|
201 to 225
|
46.02
|
72.816
|
43.08
|
18.14
|
|
226 to 250
|
42.27
|
68.5888
|
36.2
|
14.40
|
|
251 to 275
|
48.48
|
80.0156
|
52.52
|
22.64
|
|
276 to 300
|
42.09
|
75.3317
|
41.0435
|
16.98
|
|
301 to 325
|
52.49
|
76.6588
|
53.56
|
21.40
|
|
326 to 350
|
50.51
|
68.6932
|
36.76
|
15.28
|
|
351 to 375
|
46.37
|
57.8552
|
30.64
|
14.78
|
|
376 to 400
|
56.84
|
72.5042
|
43.4167
|
16.69
|
|
401 to 425
|
50.86
|
77.428
|
42.96
|
16.91
|
|
426 to 450
|
55.45
|
83.5217
|
52.9583
|
18.37
|
|
451 to 463 (13)
|
43.93
|
77.99
|
36.2308
|
13.57
|
|
Grand Average
|
45.02
|
74.5841
|
40.7655
|
17.65
|
पहिले
तब्बल 25 सामने सचिनचा प्रभाव अजिबात दिसत नाही ! पहिल्या दोन सामन्यात त्याला
भोपळाही फोडता आलेला नाही. तसे पहिल्या तब्बल 75 सामन्यांची सचिनचा आकडेवारी
बघितल्यास तो प्रभावहीन वाटतो. भारतीय संघात त्याला एवढी संधी कशी मिळाली याचेच
आश्चर्य वाटते पण त्याच्यावर दाखविलेला विश्वास त्याने खरा करून दाखविला हे मान्य
करायला हवे. 70 व्या सामन्यापासून तो सलामीला येवू लागला व मग त्याची फलंदाजी
बहरली. 76 तो 100 सामने या टप्प्यात सचिन चौकार-षटकारांची आतषबाजी करीत होता
(धावातला वाटा 55 % ) व ही सरासरी त्याने 376 ते 450 सामने या तशा कारकिर्दीतल्या
उत्तरार्धात सुद्धा करून दाखविली आहे हे ही उल्लेखनीय. दरम्यानच्या काळात मोठे
फटके न खेळताही त्याने चांगली धावगती राखली आहे याचा अर्थ, चेंडू प्लेस करून
एकेरी, दुहेरी धावा पळून काढण्याचे तंत्र त्याने चांगलेच आत्मसात केले असे लक्षात
येते. 451 ते 463 या शेवटच्या टप्प्यात मात्र त्याला धावांसाठी झगडावे लागत होते
हे अगदी स्पष्ट दिसते. अंतिम पर्वातली त्याची सरासरी, धावगती अगदीच रोडावलेली आहे
व संघाच्या धावसंख्येतले त्याचे योगदान सुद्धा नगण्यच आहे.
56
सामन्यात (निकाल लागलेल्या ) संघाच्या धावसंख्येत सचिनचा वाटा आहे 40 % , पण तरीही
सहकार्यांनी घात केल्याने भारत 14 वेळा सामना हरलेला आहे, यात 5 वेळा सचिनला सामनावीर म्हणून गौरविले
आहे. बाकी 41 सामन्यात सचिनने भारताला एकहाती विजय मिळवून दिलेला आहे, सामनावीर
म्हणून यथार्थ गौरव झालेला आहे 34 वेळा.
62
वेळा सामनावीर ठरताना सचिनची धावगती आहे 100, सरासरी आहे 101 व संघाच्या
धावसंख्येतला वाटा 40 %. जवळपास अर्ध्या धावा चौकार-षटकारांची आतषबाजी करून !
सचिनला
सलामीला खेळायला मिळालेच नसते तर ?
सचिनने
सलामीला येवून काढलेल्या धावा व इतर क्रमांकावर येवून काढलेल्या धावा यात कमालीचा
फरक आहे. तसा सहावा क्रमांक सुद्धा त्याला मानवलेला दिसतो पण त्या क्रमांकावर
खेळताना अर्थातच संघाच्या धावसंख्येतला त्याचा वाटा नगण्य असला तरी त्याला
फटकेबाजीस अधिक वाव मिळालेला दिसतो कारण त्याची धावगती आहे 139 ! कोणत्याही
कारणाने सचिनला सलामीला पाठविणे शक्य झाले नसते तर सचिनची कारकिर्द एवढी खचितच
बहरली असती.
% Score by Bdr's.
|
% to teams total.
|
|||
47 (1)
|
52.08
|
76.29255319
|
34.57446809
|
16.07
|
293 (2)
|
50.34
|
78.07460751
|
46.70648464
|
19.79
|
10 (3)
|
21.01
|
38.227
|
9.2
|
5.30
|
61 (4)
|
27.77
|
60.98737705
|
33.75409836
|
15.23
|
36 (5)
|
26.61
|
69.71722222
|
22.13888889
|
10.51
|
4 (6)
|
48.02
|
139.52
|
37
|
12.69
|
1 (7)
|
20.00
|
80
|
20
|
9.57
|
11 (DNB)
|
||||
Grand Average
|
45.02
|
74.58409292
|
40.76548673
|
17.65
|
सचिनचे
शतक 18 वेळा हूकले आहे ( 90 ते 99 ) तेव्हा भारताच्या धावसंख्येत त्याचा वाटा आहे
36 % (कारकिर्दीतली सरासरी 17.75 % ),
तेव्हा(ही) भारत 7 वेळा सामना हरला आहे .
सचिन
संघात असताना 200 सामन्यात भारत हरलेला आहे. सचिनची तेव्हाची सरासरी आहे अवघी 32,
संघाच्या धावसंख्येतला वाटा आहे फक्त 14.50 व धावगती आहे 67. सचिन असताना
मिळालेल्या 234 विजयात सचिनची सरासरी आहे 48, धावगती आहे 80 तर संघाच्या
धावसंख्येतला वाटा 20 %. तेव्हा भारताच्या विजयाचा शिल्पकार जसा सचिन तसाच पराभवाला कारणही तोच आहे ! तुच घडविसी, तुच
मोडीसी !
सचिन
असताना भारताने 5 सामने बरोबरीत सोडविले आहेत. त्यात सचिनची सरासरी आहे 33, धावगती 80 व संघाच्या धावसंख्येतला वाटा
फक्त 11 %. म्हणजे इथे सचिन निर्णायक घटक नाही !
सचिन
असतानाच्या 234 विजयात, 56 वेळा सचिनला सामना वीराचा सन्मान मिळाला आहे तर 200
पराभवातही 6 वेळा त्याचा सामनावीर म्हणून गौरव झाला आहे.
मोठ्या
लक्षाचा पाठलाग –
विजयासाठी
275 व त्या पेक्षा अधिक धावसंख्या नक्कीच आव्हानात्मक असते व अशावेळी फलंदाजांचा कस
लागतो. फलंदाजांसाठी ही अग्निपरीक्षाच असते. सचिनला अशी परीक्षा तब्बल 58 वेळा
द्यावी लागली आहे व अशा बिकट प्रसंगातही त्याची धावगती 82 आहे, सरासरी आहे 40 (
दोन्ही कारकिर्दीतल्या सरासरीपेक्षा थोडी कमीच आहे ) पण संघाच्या धावसंख्येतला
वाटा आहे फक्त 15.42 %. जो एरवी संघाच्या विजयात 20 % आहे. मोठ्या धावसंख्येचा
पाठलाग करताना 43 वेळा आपण हरलो तर 12 वेळा विजयी ठरलो, 2 सामने अनिर्णीत राहिले.
पराभवात सचिनची धावगती 77, सरासरी 40 तर संघाच्या धावसंख्येतला वाटा 16 %, 12
सामन्यात यशस्वी पाठलाग करता आला तेव्हाची सरासरी आहे 42, धावसंख्येतला वाटा आहे
14 पण धावगती आहे 102. धावगतीतला फरक नजरेत भरणारा आहे . मोठ्या धावसंखेचा पाठलाग
करताना पराभवात सचिनची सरासरी चांगली असली तरी धावगती खूपच कमी आहे, कसोटीतही
सचिनची धावगती 60 च्या आसपास आहे व वन डे कारकिर्दीत 86 तेव्हा मोठ्या पाठलागाचे
दडपण त्याच्यावर येते व त्याची फटकेबाजी बहरत नाही असे म्हणायला काही हरकत नाही.
मोठ्या लक्षाचा पाठलाग करण्याच्या 58 सामन्यात सचिनला 3 वेळा पराभवात व 2 वेळा
विजयात सामनावीराचा सन्मान मिळाला आहे.
या तुलनेत सचिन संघात असताना, पहिली फलंदाजी करताना,
भारताने प्रतिस्पर्ध्याला जेव्हा 275+ असे तगडे आव्हान दिले तेव्हा सचिनची बॅट
चांगलीच तळपली आहे. अशा 64 सामन्यात सचिनची धावगती आहे 90.57, सरासरी आहे 73.43 व संघाच्या
धावसंख्येतील वाटा आहे 23 % . हे सर्वच त्याच्या कारकिर्दीतील सरासरीपेक्षा खूपच
जास्त आहे. शतके आहेत 25 व 4 वेळा त्याचे
शतक हुकले आहे ! सचिन सामन्याचा मानकरी ठरला आहे 17 वेळा ! भारताला तब्बल 50 वेळा
विजय मिळालेला आहे व एक सामना बरोबरीत सूटला आहे. प्रथम खेळून मोठी धावसंख्या
उभारताना सचिनची कामगिरी खरेच थक्क करणारी
आहे !
82 सामन्यात सचिन फलंदाजीत अपयशी ठरूनही ( 25 वा त्या
पेक्षा कमी धावा करून बाद ) संघ विजयी ठरलेला आहे. पण या सामन्यात त्याने
काढलेल्या विकेट आहेत 73 ( कारकिर्दीत, 463 सामन्यात 154 ), म्हणजे फलंदाजीतले
अपयश त्याने चांगली गोलंदाजी करून भरून काढलेले आहे.
सामन्यात 2 किंवा त्या पेक्षा जास्त विकेट सचिनने 33 वेळा
घेतल्या आहेत ( दोनदा 5 बळी, चारदा 4 बळी, आठ वेळा 3 बळी ), हे करताना त्याची
फलंदाजीतली सरासरी आहे 39.
दोन वेळा फलंदाजीत साफ अपयशी ठरूनही ( 5 व 4 विकेट ) भेदक
गोलंदाजी करून संघाला विजयी केले आहे व सामनावीराचा मानकरी ठरला आहे. एका सामन्यात
प्रथम फलंदाजी करताना 141 धावा करून मग 9.1 षटकात 38 धावात 4 बळीही घेतले आहेत.
खरी अष्टपैलू कामगिरी !
28 सामन्यात सचिनने पुर्ण 10 षटके गोलंदाजी केलेली आहे,
म्हणचे त्याने संघाची पाचव्या गोलंदाजाची गरज भागविली आहे. सरासरी 3.94 व 45 विकेट सुद्धा काढल्या आहेत. सचिनने कारकिर्दीच्या सुरवातीला फलंदाजीत
अपयशी ठरूनही संघातले स्थान राखले ते त्याच्या गोलंदाजीच्या बळावरच !
99 सामन्यात सचिनने किमान एक विकेट काढलेली आहे. या सामन्यात त्याची फलंदाजीची सरासरी आहे 38
(नाबादचा विचार केलेला नाही.) 171 सामन्यात सचिनने गोलंदाजी केली पण विकेट काही
त्याला घेता आलेली नाही. पुढे फलंदाजी बहरल्यावर सचिनमधला गोलंदाज मागे पडला.
फलंदाजी बहरल्यावर सचिनचा कर्णाधारांनी गोलंदाज म्हणून वापर केलाही नसावा.
त्याच्यातल्या गोलंदाजावर अन्याय झाला असे माझे ठाम मत आहे.
आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी ज्या एक्सेल शीटचा आधार
घेतला आहे ती सुद्धा खालील दुव्यावर शेयर करीत आहे.
http://www.mediafire.com/?jc734v09yfngl
संपूर्ण आकडेवारी एका झटक्यात कोठेही मिळत नाही. 4
वेगवेगळ्या साइटसचा आधार घेवून ही शीट बनविली आहे. अर्थात मुख्य आधार आहे तो espncricinfo.com या वेबसाइटचा.
काही चुका झाल्या असतील तर जरूर कळवाव्यात. धन्यवाद !