विद्यार्थ्यांचे रामदास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्यार्थ्यांचे रामदास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १ जुलै, २००८

समारोप !

समारोप !
सुमारे ३५० वर्षापुर्वी मरगळलेल्या महाराष्ट्राला समर्थाच्या या वाणीने संजीवनी दिली होती.उद्याचा भारत घडविणार्या विद्यार्थ्यांना ती अजूनही मार्गदर्शक ठरू शकते.हा या पुस्तिका कर्त्याचा उद्देश आहे तो सफळ होवो हीच समर्थांचरणी प्रार्थना!


अक्षरश: झपाटल्याप्रमाणे वरील सर्व लिहून पूर्ण केले ! एरवी या कामाला १० दिवस सहज लागले असते ! पण एक अध्याय लिहून झाला की आपसूकच दूसरा पण लिहायला घ्यावा असे होउ लागले ! एकदा लिहीणे म्हणजे तिनदा वाचणे, त्या मूळे माझेही वाचन, मनन होतच होते. आता संपूर्ण दासबोध विकत घेउन, वाचून पूर्ण करायचा आहे !


काही श्लोकांचे / शब्दांचे अर्थ मलाही कळले नाहीत उदा. 'बहुत दिवस राहो नये पिसुणाचेथे ' यातील पिसुणाचेथे चा अर्थ कोणी सांगू शकेल काय ? या श्लोकांचा / शब्दांचा अर्थ याच topic वर विचारावा व जाणकारांनी उत्तरे द्यावीत ही विनंती.


वरील श्लोकात शुद्ध लेखनाच्या काही चूका झाल्या असतील तर कृपया त्या ही निदर्शनास आणाव्यात ही विनंती. समर्थांच्या मराठीचा बाज काही वेगळाच आहे, मराठीतले नेहमीचे शुद्ध लेखनाचे नियम येथे लागू होत नाहीत हे लक्षात ठेउन प्रमाण ग्रंथ आवृत्ती समोर ठेउनच दूरूस्त्या सूचवाव्यात.


नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी

नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू

जय जय रघुवीर समर्थ


श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश


माझी काया आणि वाणी


गेली म्हणाल अंत:करणी


परी मी आहे जगज्जीवनी


निरंतर १
आत्माराम दासबोध


माझे स्वरूप स्वत:सिद्ध


असता ना करावा खेद


मक्तजनी २

श्री समर्थांचा मुलांना उपदेश

श्री समर्थांचा मुलांना उपदेश

बरे सत्य बोला यथातथ्य चाला

बहू मानिती लोक येणे तुम्हाला

धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो

बरा गुण तो अंतरामाजि राहो

दिसामाजी काही तरी रे लिहावे

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे

बरे बोलणे सत्य जीवी धरावे

बहू खेळ खोटा सदालस्य खोटा

समस्तांसि भांडेल तोचि करंटा

बहुता जनांलागि जीवी भजावे

भल्यासंगती न्याय तेथे भजावे

भला रे भला बोलती ते करावे

बहुता जनांचे मुखे येश घ्यावे

परी शेवटी सर्व सोडोनी द्यावे

मरावे परी कीर्तिरूपे उरावे

भगवंताकडे काय मागावे ?

भगवंताकडे काय मागावे ?--

कोमळ वाचा दे रे राम विमळ करणी दे रे राम धृ

प्रसंग ओळखी दे रे राम धूर्तकळा मज दे रे राम

हितकारक दे रे राम जनसुखकारक दे रे राम

अंतरपारखी दे रे राम बहुजनमैत्री दे रे राम

विद्यावैभव दे रे राम उदासीनता दे रे राम

मागो नेणे दे रे राम मज न कळे ते दे रे राम

तुझी आवडी दे रे राम दास म्हणे मज दे रे राम

संगीत गायन दे रे राम आलाप गोडी दे रे राम

धातमाता दे रे राम अनेक धाटी दे रे राम

रसाळ मुद्रा दे रे राम जाड कथा मजा दे रे राम

दस्तक टाळी दे रे राम नृत्यकला मज दे रे राम

प्रबंध सरळी दे रे राम शब्द मनोहर दे रे राम

सावधपण मज दे रे राम बहुत पाठांतर दे रे राम

दास म्हणे रे सद्-गुण धाम उत्तम गुण मज दे रे राम

पावनभिक्षा दे रे राम दीनदयाळा दे रे राम

अभेदभक्ती दे रे राम आत्मनिवेदन दे रे राम

तद्रूपता मज दे रे राम अर्थारोहण दे रे राम

सज्जनसंगती दे रे राम अलिप्तपणा मज दे रे राम

ब्रह्म अनुभव दे रे राम अनन्यसेवा दे रे राम

मजविण तू मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम

बोलणे सुंदर--वाचणे सुंदर -- लिहिणे सुंदर

बोलणे सुंदर--वाचणे सुंदर -- लिहिणे सुंदर--

बालके बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर

जे देखतांचि चतुर समाधान पावती

वाटोळे सरळ मोकळे वोतले मसीचे काळे

कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे मुक्तमाळा जैशा

अक्षरमात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट

आडव्या मात्र त्याहि नीट आकुर्ली वेलांड्या

पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहात गेले

येका टाकेचि लिहिले ऐसे वाटे

वोळीस वोळी लागेना आकुर्ली मात्रा भेदीना

खालिले वोळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर

पान शिषाने रेखाटावे त्यावरी नेमकचि ल्याहावे

दुरी जवळी न व्हावे अंतर वोळीचे

कोठे शोधासी आडेना चुकी पाहता सापडेना

गरज केली हे घडेना लेखकापासुनी

ज्याचे वय आहे नूतन त्याने ल्याहावे जपोन

जनासी पडे मोहन ऐसे करावे

भोवती स्थळ सोडून द्यावे मधेचि चमचमित ल्याहावे

कागद झडताही झडावे नलगेचि अक्षर

ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा प्राणिमात्रास उपजे हेवा

ऐसा पुरूष तो पहावा म्हणती लोक

सुंदर अक्षर ल्याहावे पष्ट नेमस्त वाचावे

विवर विवरो जाणावे अर्थांतर

अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोन असावे

प्रगट होउन नासावे हे बरे नव्हे

अक्षरे गाळून वाची कां ते घाली पदरिंची

नीगा न करी पुस्तकाची तो येक मूर्ख

आपण वाचीना कधी कोणास वाचावया नेदी

बांधोन ठेवी बंदी तो येक मूर्ख

समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण

गुण सांगतां अवगुण पाहे तो येक पढतमूर्ख

आधीच सिकोन जो सिकवी तोचि पावे श्रेष्ठ पदवी

गुंतल्या लोकांस उगवी विवेकबळे

अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर

भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी

अखंड येकांत सेवावा ग्रंथमात्र धांडोळावा

प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी

विद्या उदंडचि सिकला प्रसंगमान चुकतचि गेला

तरी मग तये विद्येला कोण पुसे

कुणाचे अंत:करण दुखवू नका

कुणाचे अंत:करण दुखवू नका --

दुसर्याचे चालणी चालावे दुसर्याचे बोलणी बोलावे

दुसर्याचे मनोगत जावे मिळोनिया

आधी अंतर हाती घ्यावे मग हळुहळु उकलावे

नाना उपाये न्यावे परलोकासी

प्रसंग जाणोनि बोलावे जाणपण काहीच न घ्यावे

लीनता धरून जावे जेथतेथे

परांतरास न लावावा ढका कदापि पडो नेदावा चुका

क्षमासीळॅ तयाच्या तुका हानी नाही

बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते

आत्मवत परावे ते मानीत जावे

जे दुसर्यास दु:ख करी ते अपवित्र वैखरी

आपणास घात करी कोणीयेके प्रसंगी

कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगिले

क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक

पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते

तरी मग कर्कश बोलावे ते काये निमित्य

जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र

कोठे त-ही सत्पात्र शोधून काढावे

शेजार्यांना मदत करा

शेजार्यांना मदत करा---
आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे
परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे
तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेचि ज्ञान जनास सांगावे
तरतेन बुडो नेदावे बुडतयासि
शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे
उणे पडो नेदावे कोणियेकाचे
आडले जाकसले जाणावे यथानशक्ती कामास यावे
मृदवचने बोलत जावे कोणीयेकासी
दुसर्याच्या दु:खे दुखवावे परसंतोषे सुखी व्हावे
प्राणिमात्रास मेळउन घ्यावे बर्या शब्दे
बहुतांचे अन्याये क्षमावे बहुतांचे कार्यभाग करावे
आपल्यापरीस व्हावे पारखे जन
दुसर्याचे अंतर जाणावे तदनुसारचि वर्तावे
लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे
नेमकचि बोलावे तत्काळचि प्रतिवचन द्यावे
कदापी रागास यावे क्षमारूपे उत्तम पदार्थ दूसर्यास द्यावा शब्द निवडून बोलावा
सावधपणे करीत जावा संसार आपला
आपल्या पुरूषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे
परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया
शाहाणे करावे जन पतित करावे पावन
सृष्टीमधे भगवद्-भजन वाढवावे
जितुके काही आपणासी ठावे तितुके हळुहळु सिकवावे
शाहाणे करूनि सोडावे बहुत जन
अपार असावे पाठांतर सन्निधचि असावा विचार
सदा सर्वदा तत्पर परोपकारासी
मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे
तैसे जनास सिकवावे हळुहळु
जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा
राहराहो शोध घ्यावा परांतरांचा

खूप मित्र जोडा

खूप मित्र जोडा --
आपण दुसर्यास करावे ते उसिणे सवेचि घ्यावे
जना कष्टविता कष्टावे लागेल बहु
लोक आपणासि वोळावे किंवा आवघेच कोसळावे
आपणास समाधान पावे ऐसे करावे
समाधाने समाधान वाढे मित्रिने मित्रि जोडे
मोडिता क्षणमात्र मोडे बरेपण
तने नमे झिजावे तेणे भले म्हणोन घ्यावे
उगेचि कल्पिता सिणावे लागेल पुढे
आपण येकायेकी येकला सृष्टीत भांडत चालिला
बहुतांमध्ये येकल्याला येश कैचे
बहुतांचे मुखी उरावे बहुतांचे अंतरी भरावे
उत्तम गुणी विवरावे प्राणिमात्रासी
उदंड धि:कारून बोलती तरी चळो नेदावी शांती
दुर्जनास मिळोन जाती धन्य ते साधु
स्वये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे
झिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे
कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही
विचारेविण कोठेचि नाही समाधान

उत्तम गुण अभ्यासिता येती

उत्तम गुण अभ्यासिता येती--
वाट पुसिल्याविण जाउ नये फळ वोळखिल्याविण खाउ नये
पडिली वस्तु घेउ नये येकायेकी अति वाद करू नये पोटी कपट धरू नये
शोधिल्याविण करू नये कुळहीन कांता
विचारेविण बोलो नये विवंचनेविण चालो नये
मर्यादेविण हालो नये काही येक
वक्त्यास खोदू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्याअभ्यास सोडू नये काही केल्या
अति क्रोध करू नये जोवलगांस खेदू नये
मनी वीट मानू नये सिकवणेचा
क्षणाक्षणा रूसो नये लटिका पुरूषार्थ बोलो नये
केल्याविण सांगो नये आपला पराक्रमु
बोलिला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चूको नये केल्याविण निखंदू नये पुढिलांसी कदा
आळसे सुख मानू नये चाहाडी मनास आणू नये
शोधिल्याविण करू नये कार्य काही
सुखा आंग देउ नये प्रेत्न पुरूषे सांडू नये
कष्ट करिता त्रासो नये निरंतर
कोणाचा उपकर घेउअ नये घेतला तरी राखो नये
परपीडा करू नये विस्वासघात
बहुत अन्न खाउ नये बहुत निद्रा करू नये
बहुत दिवस रहो नये पिसुणाचेथे
धूम्रपान घेउ नये उन्मत्त द्रव्य सेउ नये
बहुचकासी करू नये मैत्री कदा
तोंडी सीवी असो नये दुसर्यास देखोन हांसो नये
उअणे अंगी संचारो नये कुळवंताचे
देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होउअ नये
जिवलगांसी करू नये कळह कदा
अलाधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये
मर्यादेविण चालो नये पवित्र जनी
सभा देखोन गळो नये समई उत्तर टळो नये
धि:कारिता चळोप नये धारिष्ट आपुले
सत्यमार्ग सांडू नये असत्य पंथे जाउअ नये
कदा अभिमान घेउ नये असत्याचा
अपकीर्ती ते सांडावी सदकीर्ती वाढवावी
विवेके दृढ धरावी वाट सत्याची
पोटी चिंता धरू नये कष्टे खेद मानू नये
समी धीर सांडू नये काही केल्या
अपमानित सिणो नये निखंदिता कष्टो नये
धि:कारिता झुरो नये काही केल्या
नित्यनेम सांदू नये अभ्यास बुडो देउ नये
परतंत्र होउ नये काही केल्या
परोपकार सांडू नये परपीडा करू नये
विकल्प पडो देउ नये कोणीयकासी
बहुसाल बोलो नये अबोलणे कामा नये बहुत अन्न खाउ नये उपवास खोटा
बहुसाल निजो नये बहुत निद्रा मोडू नये
बहु नेम धरू नये बाश्कळ खोटे
बहुजनी असो नये बहु आरण्य सेउ नये
बहुदेह पाळू नये आत्महत्या खोटी
उत्तम गुण स्वये ते बहुतांस सांगावे
वर्तल्याविण बोलावे ते शब्द मिथ्या
उत्तम गुणी श्रृंघारला ज्ञानवैराग्ये शोभला
तोचि येक जाणावा भला भूमंडळी
जंवरी चंदन झिजेना तंव तो सुगंध कळेना
चंदन आणि वृक्ष नाना सगट होती
जनीजनार्दन वोळला तरी काय उणे तयाला
राजी राखावे सकळांला कठीण आहे

अवगुण सोडीता जाती

अवगुण सोडीता जाती
सकळ अवगुणामधे अवगुण आपले अवगुण वाटती गुण
मोठे पाप करंटपण चुकेना की
आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती
सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख
अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी
जो बहुतांचा वैरी तो येक मूर्ख
बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन
परस्थळी बहु भोजन करी तो ये मूर्ख
घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे
शब्द बोलता निर्बुजे तो येक मूर्ख
आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट
सिकवणेचा मानी वीट तो येक मूर्ख
स्वये नेणे परोपकार उपकाराचा अनोपकार
करी थोडे बोले फार तो येक मूर्ख
दंत चक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण
सर्वकाळ जयाचे मळीण तो येक मूर्ख
जिवलगांस परम खेदी सुखाचा शब्द तोहि नेदी
नीच जनांस वंदी तो येक मूर्ख
परपीडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दु:ख
गेले वस्तूचा करी शोक तो येक मूर्ख
अल्प अन्याय शमा न करी सर्वकाळ धारकी धरी
जो विस्वासघात करी तो येक मूर्ख
आपले काज होये तंतरी बहुसाल नम्रता धरी
पुढीलांचे कार्य न करी तो येक मूर्ख
दोष ठेवी पुढिलांसी तेचि स्वये आपणापासी
ऐसे कळेना जयासी तो येक पढतमूर्ख
मागे येक पुढे येक ऐसा जयाचा दंडक
बोले येक करी येक तो येक पढतमूर्ख
रात्रंदिवस करी श्रवण न सांडी आपले अवगुण
स्वहित आपले आपण नेणे तो येक पढतमूर्ख

बहिरंग नव्हे ; अंतरंग सुधारा

बहिरंग नव्हे ; अंतरंग सुधारा
रूप लावण्या अभ्यासिता न ये सहजगुणास न ये उपाये
काही तेरी धरावी सोये अगांतुक गुणाची
काळे माणुस गोरे होयेना वनाळास येत्न चालेना
मुक्यास वाचा फुटेना हा सहजगुण
आंधळे डोळस होयेना बद्धिर ते ऐकेना
पांगुळ पाये घेईना हा सहजगुण
अवगुण सोडिता जाती उत्तमगुण अभ्यासित येती
कुविद्या सांडून सिकती शाहणे विद्या
मूर्खपणा सांडिता जाते शाहाणपण सिकता येते
कारबार करिता उमजते सकळ काही
मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी
चातुर्येविण उंच पदवी कदापि नाही
अंतर्कळा शृंघारावी नानापरी उमजवावी
संपदा मेळउन भोगावी सावकास
चातुर्ये श्रृंघारे अंतर वस्त्रे श्रृंघारे शरीर
दोहिमधे कोण थोर बरे पाहा
बाह्याकार श्रृंघारिले तेणे लोकांच्या हातासि काये आले
चातुर्ये बहुतांसि रक्षिले नाना प्रकारे
वेषभूषण ते दूषण कीर्तिभूषण ते भूषण
चाळणेविण येक क्षण जाऊंच नेदी

आळस : श्रीसमर्थांचा शत्रू

आळस : श्रीसमर्थांचा शत्रू
आळसाचे फळ रोकडे जांभया देउन निद्रा पडे
सुख म्हणौन आवडे आळसी लोका
साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुखाडती
खाती जेविती सुखी होती तेत्ने करूनी
आळस उदास नागवणा आळस प्रेत्नबुडवणा
आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती
म्हणौन आळस नसावा तरीच पाविजे वैभवा
अरत्री परत्री जीवा समाधान
लहानथोर काम काही केल्यावेगळे होत नाही
करंट्या सावध पाही सदेव होसी
म्हणोन आळस सोडावा येत्न साक्षेपे जोडावा
दुश्चितपणाचा मोडावा थारा बळे
आलस्य अवघाच दवडावा येत्न उदंडचि करावा
शब्दमत्सर न करावा कोणीयेकाचा
झिजल्यावाचुनी कीर्ति कैची मान्यता नव्हे की फुकाची
जिकडे तिकडे होते ची ची अवलक्षणे
कष्टेविण फळ नाही कष्टेविण राज्य नाही
केल्याविण होत नाही साध्य जनी
आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते
कष्टाकडे चुकविते हीन जन
आधी कष्टांचे दु:ख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती
आधी आळसे सुखावती त्यासी पुढे दु:ख
जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले
येर ते बोलतचि राहिले करंटे जन

व्यायाम हवा

व्यायाम हवा
धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला
नाना बुद्धी शक्ताला म्हणोनी सिकवाव्या
शक्तीने पावती सुखे शक्ती नसता विटंबना
शक्तीने नेटका प्राणी वैभव भोगिता दिसे
कोण पुसे अशक्ताला रोगीसी बराडे दिसे
शक्ती तो सरझी सुखे शक्ती आनंद भोगवी
शक्तीने मिळॅती राज्ये युक्तीने यत्न होतसे
शक्री युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती
असो हे बोलणे जाले युक्तीवीण कामा नये
युक्तीला पाहिजे शक्ती तस्मात शक्ती प्रमाण हे

आदर्श दिनचर्या

आदर्श दिनचर्या
प्रात:काळी उठावे काही पाठांतर करावे
येथानशक्ती आठवावे सर्वोत्तमासी
मागील उजळणी पुढे पाठ नेम धरावा निकट
बाष्कळपणाची वटवट करूच नये
काही फळाहार घ्यावा मग संसारधंदा करावा
सुशब्दे राजी राखावा सकळ लोक
ज्या ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबर्दार
दुश्चीतपणे तरी पोर वेढा लावी
चुके ठके विसरे सांडी आठवण जालिया चर्फडी
दुश्चित आळसाची रोकडी प्रचित पाहा
ऐक सदेवपणाचे लक्षण रिकामा जाउ नेदी येक क्षण
प्रपंच वेवसायाचे ज्ञान बरे पाहे

मम जीवनाचा शिल्पकार मी--

मम जीवनाचा शिल्पकार मी--
हे आवघे आपणापासी येथे बोल नाही जनासी
सिकवावे आपल्या मनासी क्षणाक्षणा
जे दुसर्यास सांगावे ते तुंवा स्वयेचि करावे
ऐसे केलिया स्वभावे समाधान सकळिका
कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान
विचारीना पाप पुण्य तो रजोगुण
मी तरूण मी सुंदर मी बलाढ्य मी चतूर
मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण
दुसर्याचे सर्व जावे माझेचि बरे असावे
ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण
टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा
हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण
शेरीरी क्रोध भरतां नोळखे माता पिता
बंधु बहिण कांता ताडी तो तमोगुण
वरी चांगला अंतरी गोड नाही
तया मानवाचे जिणे वेर्थ पाही
वरी चांगल अंतरी गोड आहे
तयालागी कोणीतरी शोधिताहे
भला रे भला बोलती ते करावे
बहुता जनांचे मुखे येश घ्यावे
परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे
मरावे परी कीर्तिरूपे उरावे

आत्मविश्वास हवा -- धैर्य हवे -- प्रयत्न हवेत.

आत्मविश्वास हवा -- धैर्य हवे -- प्रयत्न हवेत.
धीर धरा धीर धरा तकवा हडबडू गडबडू नका
काळ देखोनि वर्तावे साडावे भय पोटिचे
धरावा धीर तो मोठा विचारे पाहता बरे
अधीर माणसे खोटी काम काही कळेचिना
जो दुसर्यावरी विशवासला त्याचा कार्यभाग बुडाला
जो आपणचि कष्टत गेला तोचि भला
रेखा तितुकी पुसोन जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते
डोळे झाकणी करावी ते काये निमित्य
बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमाने बुडाले
मुख्य निश्चये चुकले प्रत्ययाचा
उदंडाचे उदंड ऐकावे परि ते प्रत्यये पाहावे
खरे खोटे निवडावे अंतर्यामी
घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड
तेथे कैचे आणिले व्दाड करंटपण
आधी कष्ट मग फळ कष्टचि नाही ते निर्फळ
साक्षेपेविण केवळ वृथापृष्ट
जो दूसर्याचे अंतर जाण देश काळ प्रसंग जाणे
तया पुरूषा काय उणे भूमंडळी
अचुक येत्न करवेना म्हणौन केले ते सजेना
आपला अवगुण जाणवेना काही केल्या
यत्नाचा लोक भाग्याचा यत्नेविण दरिद्रता
उमजला लोक तो धाला उमजेना तो हपापला
भाग्यासी काय उणे रे यत्नांवाचूनि राहिले
यत्न तो करावा कैसा हेचि आधी कळेचिना
मुख्य यत्न विचाराचा त्यावरी बोलणे बरे
चालणे सत्य नेमाचे नीतिन्याय चुको नये
बुद्धीने सर्वही होते बुद्धीदाता नारायणु
आधी तो आपला कीजे लक्षुमी चरणी वसे
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे
यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे
अचूक यत्न तो देवो चुकणे दैत्य जाणिजे
न्याय तो देव जाणावा अन्याय राक्षसी क्रीया

नरदेहाचे महत्व - दुर्लभ संधी

नरदेहाचे महत्व - दुर्लभ संधी

रविवारी पुस्तकांचा कप्पा चाळत असताना "विद्यार्थ्यांचे रामदास " नावाची पुस्तिका हाती लागली. चौकशी केल्यावर कळले की मुलाला ती शाळेत समर्थांवरील एका कार्यक्रमांत दिली होती. श्री समर्थ रामदास जन्मोत्सव चतु:शताब्दी सोहळया निमित्त कोणा समर्थ भक्ताने ती प्रसिद्ध केली आहे. मी ती एका झटक्यात वाचून काढली. खूपच छान आहे ! ज्यांना समर्थांचे विचार सारांश रूपाने वाचायचे आहेत त्यांना फारच उपयूक्त आहे. या पुस्तिकेचे मूल्य आहे 'आचरण' ! तेव्हा मित्रांनो एकतरी ओवी अनुभवावी, तसा यातला एकातरी श्लोकाचे मनन केलेत तरी आयुष्य बद्लून जाईल तुमचे !
जय जय रघुवीर समर्थ !

नरदेहाचे महत्व - दुर्लभ संधी
धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो
जो जो कीजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धीते
या नरदेहाचेनि आधारे नाना साधनांचेनि द्वारे
मुख्य सारासार विचारे बहुत सुटले
या नरदेहाचेनि संमंधे बहुत पावले उत्तम पदे
अहंता सांडून स्वानंदे सुखी जाले
पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती
म्हणौन नरदेहीच प्राप्ती परलोकाची
नरदेह हा स्वाधेन सहसा नव्हे परधेन
परंतु हा परोपकारी झिजउन कीर्तिरूपे उरवावा
देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक जाले
नाही तरी हे वेर्थचि गेले नाना आघाते मृत्युपंथे
नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ
त्याहिमधे भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे
जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ
ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये
देहे परलोकीचे तारू नाना गुणांचा गुणागरू
नाना रत्नांचा विचारू देह्याचेनी
देह्याचेन गायेनकळा देह्याचेन संगीतकळा
देह्याचेन अंतर्कळा ठाई पडे
जे जे देहे धरूनी आले ते ते काही करूनी गेले
हरिभजने पावन जाले कितीयेक
असो काही येक करणे कैसे घडे देह्याविणे
देहे सार्थकी लावणे म्हणिजे बरे