शेजार्यांना मदत करा---
आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे
परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे
तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेचि ज्ञान जनास सांगावे
तरतेन बुडो नेदावे बुडतयासि
शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे
उणे पडो नेदावे कोणियेकाचे
आडले जाकसले जाणावे यथानशक्ती कामास यावे
मृदवचने बोलत जावे कोणीयेकासी
दुसर्याच्या दु:खे दुखवावे परसंतोषे सुखी व्हावे
प्राणिमात्रास मेळउन घ्यावे बर्या शब्दे
बहुतांचे अन्याये क्षमावे बहुतांचे कार्यभाग करावे
आपल्यापरीस व्हावे पारखे जन
दुसर्याचे अंतर जाणावे तदनुसारचि वर्तावे
लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे
नेमकचि बोलावे तत्काळचि प्रतिवचन द्यावे
कदापी रागास यावे क्षमारूपे उत्तम पदार्थ दूसर्यास द्यावा शब्द निवडून बोलावा
सावधपणे करीत जावा संसार आपला
आपल्या पुरूषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे
परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया
शाहाणे करावे जन पतित करावे पावन
सृष्टीमधे भगवद्-भजन वाढवावे
जितुके काही आपणासी ठावे तितुके हळुहळु सिकवावे
शाहाणे करूनि सोडावे बहुत जन
अपार असावे पाठांतर सन्निधचि असावा विचार
सदा सर्वदा तत्पर परोपकारासी
मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे
तैसे जनास सिकवावे हळुहळु
जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा
राहराहो शोध घ्यावा परांतरांचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा