शुक्रवार, ४ जुलै, २००८

गोदीमधले विंग्रजी !

गोदीमधले विंग्रजी !
कारकून या पदासाठी आमच्याकडे सध्या असलेली जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता १० वी पास आणि त्या आधी तर सगळा आनंदच होता. स्वातंत्र्यपुर्व काळात काही काळ ब्रिटीश अधिकारी होते, त्या मुळे सगळीकडे इंग्रजीचा पगडा होताच, साहेब गेला पण गोदीच्या गाळात रूतलेली इंग्रजी काही बाहेर आली नाही. सगळे कामकाज इंग्रजीत चालते. साहेबावर छाप पाडण्याकरीता सुद्धा इंग्रजी 'तोडले' जाते. तसा आमच्याकडे बहुसंख्य स्टाफ मराठीच आहे पण इंग्रजीत बोलल्यावर छाप पडते, कामे होतात हा समज टिकून आहे. या अट्टाहासामुळे मस्त विनोद निर्मिती होत असते.
टॅली क्लार्क ला टॅली-शीट वर जहाजाचे नाव लिहायचे असते, काहींना ते नाव कोणते ते ही कळत नाही. "beware of propeller", "Permission Denied", "No Smoking" ही काहीनी लिहीलेली जहाजांची नावे आहेत !
माल उतरताना त्याची स्थिती बघून landing remark लिहायचा असतो तसेच त्याचे वर्णनही लिहायचे असते. त्यातही अनेकांनी petee petara (cases), pimpe (drums), roolya (coils) असे तारे तोडले आहेत तर landing remark घेताना chepped (dented), tootake footake (damaged) असे लिहीले आहेत.vessel चे स्पेलींग सुद्धा धड लिहीत येत नाही, tally चे पण कोणी महाभाग tali असे करीत !
एकदा मी घेतलेली टॅली आमच्या निरीक्षकाने बघितली. एका पेटीचा remark मी damaged असा घेतला होता. तो मला सांगू लागला नुसते damaged काय, planks broken, nails loose, stips off, content exposed हे पण लिहा !
संगणक विभागात असताना मी एकदा बॅक-अप संबंधि एक प्रस्ताव बनवला होता. त्यात data हा शब्द होता. मसुदा फायनल करताना माझ्या साहेबाने तो datas असा केला. मी परत प्रिंट घेताना तो माझ्या अकलेने data असा करून घेतला. साहेबाने सही करताना माझी अक्कल काढली. काळ्या पेनाने तो शब्द परत datas असा केला ! परत काही दिवसाने मसुदा करताना मात्र मला त्याने data असेच लिहून दिले. मग मी पण मुद्दाम प्रिंट काढताना ते datas असेच केले. सही करताना त्याने झक मारत ते स्वत: data असे केले. मग कळले की datas ने त्याची पुरती लाज वरीष्ठांनी काढली होती !
मला माझ्या दोन ज्युनीयर सहकार्यांना मुदतवाढ घ्यायची होती. साहेबाला सांगितले की ते familiar आहेत म्हणून मला हवेत. साहेब बोलला मराठे हे तुझे काहीतरीच , माणूस संसारी झाला म्हणून त्याला मूदतवाढ द्यायची ?
उप निबंधकाच्या कार्यालयाला सकाळी , आदल्या शिफ्ट मधे झालेल्या कामाचा तपशील द्यावा लागे, तेव्हा कोणी ते असेही देत,
वन क्रेन इज वर्कींग झपाझपा , वन इज सीटींग आयडल !
वेसल इज डिसचार्जिंग पेटी-पेटारा ऍड सटर-फटर आयटमस !
आमच्या कडे रविवारीपण काम चालू असते. अशा कामगाराला मग मधे एखादा off द्यावा लागतो. असाच एकाच्या मित्राने फोन केला, त्याला उत्तर मिळाले, "he is off today". मित्र उडालाच. अहो असे कसे झाले, मी काल तर त्याच्याशी बोललो, अचानक असे काय झाले ? मग खुलासा झाला, "that i don't know, he is off today and i will be off tomorrow !"
ट्रेनमधे साहेबाने एकाला विचारले "where are you getting off ?" उत्तर आले, बुधवारी ! साहेबाचा परत प्रश्न पणॅ वैतागुन, मग उत्तर "if position is tight may be on monday or tuesday !"
तसे मी ही एकदा important role च्या ऐवजी important roll असे केले होतेच !
एकाने रजेच्या अर्जावर "my health was out of order" असे म्हटले होते. तसे my eyes have come हे तर नेहमीचेच आहे !

1 टिप्पणी:

Aditya म्हणाले...

Chepped,tooted,footed

lol

Mastach!