बहिरंग नव्हे ; अंतरंग सुधारा
रूप लावण्या अभ्यासिता न ये सहजगुणास न ये उपाये
काही तेरी धरावी सोये अगांतुक गुणाची
काळे माणुस गोरे होयेना वनाळास येत्न चालेना
मुक्यास वाचा फुटेना हा सहजगुण
आंधळे डोळस होयेना बद्धिर ते ऐकेना
पांगुळ पाये घेईना हा सहजगुण
अवगुण सोडिता जाती उत्तमगुण अभ्यासित येती
कुविद्या सांडून सिकती शाहणे विद्या
मूर्खपणा सांडिता जाते शाहाणपण सिकता येते
कारबार करिता उमजते सकळ काही
मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी
चातुर्येविण उंच पदवी कदापि नाही
अंतर्कळा शृंघारावी नानापरी उमजवावी
संपदा मेळउन भोगावी सावकास
चातुर्ये श्रृंघारे अंतर वस्त्रे श्रृंघारे शरीर
दोहिमधे कोण थोर बरे पाहा
बाह्याकार श्रृंघारिले तेणे लोकांच्या हातासि काये आले
चातुर्ये बहुतांसि रक्षिले नाना प्रकारे
वेषभूषण ते दूषण कीर्तिभूषण ते भूषण
चाळणेविण येक क्षण जाऊंच नेदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा