शुक्रवार, ४ जुलै, २००८

शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )

शब्दांची गटबाजी ! (एक शब्दखेळ )
खेळ सोप्पा आहे ! याची सुरवात मी एक गट व त्यात बसणारे पाच शब्द देउन करणार आहे. पुढच्याने त्यातला किमान एक शब्द घेउन नवा गट बनवायचा आहे ! या गटात सगळे मिळून पाचच शब्द हवेत ! गटाचे नाव आधी देउन मग मागच्या गटातला घेतलेला शब्द आधी देउन बाकी शब्द मग द्यायचे आहेत.


उदा. खडू, फळा, बाक, वाचनालय, प्रयोगशाळा -- या शब्दांचा गट आहे 'शाळेचे घटक' .

आता यातला 'खडू' शब्द घेउन मी खडू, पेन, पेन्सिल, बोरू, बॉलपेन हे शब्द घेउन 'लिहीण्याची साधने' असा गट केला आहे.

आता तुम्ही हा गट घेउन खेळ पुढे चालू ठेवा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: