क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !
क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !कोणतेही एक मूळाक्षर (क,ख,ग,घ---) घ्या, असे शब्द बनवा कि ज्यात त्या अक्षराची किमान दोन वेगवेगळी बाराखडीतली रूपे आली पाहीजेत. उदा. क वरून काकडी (क+आ, क+अ ), सासूरवास (यात स ची स+आ, स+ऊ, स+अ अशी तीन रूपे आली आहेत) पण करमरकर हा शब्द चालणार नाही कारण यात क दोनदा आणि र तीनदा आहे पण एकाच रूपात ! तसेच मामा, काका पण नाही चालणार पण काकू चालेल ! समजले ? मी सुरवात करतो कारकून या शब्दाने, यात क्+आ आणि क्+ऊ आला आहे.
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
गुरुवार, ३ जुलै, २००८
क-का-कि-की-- बाराखडीचा शब्दखेळ !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा