मंगळवार, १ जुलै, २००८

आळस : श्रीसमर्थांचा शत्रू

आळस : श्रीसमर्थांचा शत्रू
आळसाचे फळ रोकडे जांभया देउन निद्रा पडे
सुख म्हणौन आवडे आळसी लोका
साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुखाडती
खाती जेविती सुखी होती तेत्ने करूनी
आळस उदास नागवणा आळस प्रेत्नबुडवणा
आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती
म्हणौन आळस नसावा तरीच पाविजे वैभवा
अरत्री परत्री जीवा समाधान
लहानथोर काम काही केल्यावेगळे होत नाही
करंट्या सावध पाही सदेव होसी
म्हणोन आळस सोडावा येत्न साक्षेपे जोडावा
दुश्चितपणाचा मोडावा थारा बळे
आलस्य अवघाच दवडावा येत्न उदंडचि करावा
शब्दमत्सर न करावा कोणीयेकाचा
झिजल्यावाचुनी कीर्ति कैची मान्यता नव्हे की फुकाची
जिकडे तिकडे होते ची ची अवलक्षणे
कष्टेविण फळ नाही कष्टेविण राज्य नाही
केल्याविण होत नाही साध्य जनी
आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते
कष्टाकडे चुकविते हीन जन
आधी कष्टांचे दु:ख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती
आधी आळसे सुखावती त्यासी पुढे दु:ख
जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले
येर ते बोलतचि राहिले करंटे जन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: