कुणाचे अंत:करण दुखवू नका --
दुसर्याचे चालणी चालावे दुसर्याचे बोलणी बोलावे
दुसर्याचे मनोगत जावे मिळोनिया
आधी अंतर हाती घ्यावे मग हळुहळु उकलावे
नाना उपाये न्यावे परलोकासी
प्रसंग जाणोनि बोलावे जाणपण काहीच न घ्यावे
लीनता धरून जावे जेथतेथे
परांतरास न लावावा ढका कदापि पडो नेदावा चुका
क्षमासीळॅ तयाच्या तुका हानी नाही
बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते
आत्मवत परावे ते मानीत जावे
जे दुसर्यास दु:ख करी ते अपवित्र वैखरी
आपणास घात करी कोणीयेके प्रसंगी
कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगिले
क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक
पेरिले ते उगवते बोलण्यासारिखे उत्तर येते
तरी मग कर्कश बोलावे ते काये निमित्य
जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र
कोठे त-ही सत्पात्र शोधून काढावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा