धक्का तंत्र !
नाही, गर्दीचा फायदा घेण्याचे तंत्र मी सांगणार नाही आहे ! मला तशी अनेक तंत्र अवगत आहेत, पण सगळ्यात हुकमत मात्र धक्का तंत्रावर आहे ! मी आतापर्यंत अनेकांवर याचा प्रभावी वापर केलाय आणि ते अजून त्या प्रभावाखाली आहेत ! अर्थात माझे धक्के नेहमीच सुखद असतात, pleasant surprise ! त्यातलेच एक मासलेवाईक उदाहरण देउन सूकाणू तुमच्या कडे देतो !आम्ही वडाळ्याला असताना शिवाजी मंदीर ला नाटके बघायला बर्याचदा जायचो. प्रशांत दामलेच्या "गेला माधव कोणी कडे" चा प्रयोग दूपारी चारला असल्यामुळे मला बघता येणार नव्हता तेव्हा बायको व दोन मुलांची तिकिटे काढण्यासाठी रांगेत उभा राहीलो. ऐन वेळी काही वेगळा विचार करून मी एक जास्त तिकिट काढले ! दूसर्या दिवशी boss ची परवानगी घेउन मी लवकर ऑफीस सोडले. नाट्यगृहात काळोख होत असतानाच मी 'प्रवेश' केला. बायको दोन मुलांच्या मधे बसली होती ! पण नशीब जोरावर होते ! कोणीतरी उंच माणूस पुढे बसल्यामुळे रिकाम्या खुर्चीच्या बाजुला बायको आली ! कलाकार रंगमचावर आल्यावर मी ह्ळूच बायकोच्या बाजूला स्थानापन्न झालो ! त्यात मुलगी बोललीच "शी आई, बाबा यायला हवे होते ना ?" थोड्या वेळाने मी हीला कोपराने ढोसले ! ही खुर्चीवर जेवढे आखडून बसता येइल तेवढे बसली पण माझ्याकडे ढूकूनही न बघता ! थोडया वेळाने मी हीच्या गळ्याभोवती हात टाकला आणि हीने तो झूरळा सारखा झटकून टाकला व ताडकन उभी राहात मोठ्याने "काही लाज बीज आहे की नाही" ओरडली ! आसपासचे प्रेषक नाटकातले नाटक डोळे फाडून बघु लागले ! बायकोने मला ओळखले व या नाटकावर पडदा पडला. पण आसपासच्या प्रेषकांना या नाट्यमय कलाटणीचा अर्थ शेवट पर्यंत कळला नाही !
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, २७ जून, २००८
धक्का तंत्र !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा