पहीला वहीला पंचनामा !
जेव्हा संगणकीकरणाचा विस्तार पूर्ण झाला तेव्हा जहाजातने उतरलेला माल तात्पुरता ठेवण्यासाठी शेडस, मग गोदामे, व मालाच्या सोडवणूक करतात ती गेटस अशी एकूण १२० terminals बसवली गेली होती. सोबत मॉडेम व गरजेप्रमाणे प्रिंटर बसवला जाई. पुढे पुढे काम कमी झाल्यामुळे किंवा त्याचा pattern बदलल्यामुळे अनेक points बंद करण्यात आले. काही नवे points चालू करण्यात आले. बंद केलेल्या अनेक ठीकाणी संगणक तसेच पडून होते व अनेक ठीकाणी अतिरीक्त कामामुळे त्यांची आवश्यकता होती. शेवटी मीच पुढाकार घेउन एक shifting plan बनविला, जीप, शिपाई व विभाग प्रमुखाचे पत्र घेउन ही मोहीम चालू केली. असेच एका गेटला गेलो तर ते बंद होते. त्याची किल्ली time keeper कार्यालयातुन सही करून घेतली व गेटच्या केबिनचे दार उघडले. आणि आश्चर्याचा धक्काच बसला ! संगणक, मॉडेम, प्रिंटर तिकडे नव्हतेच. हे कमी म्हणून की काय पंख्याची पाती पण कापून नेली होती. केबिनच्या खिडकीची काच फोडून कोणीतरी ते चोरले होते !गोदीतल्या नोकरीत खरे तर चोरी - पोलीस - पंचनामा - साक्ष या गोष्टी तशा नित्याच्याच, त्याचा पुढे पुढे त्रासही होत नाही ! पण मला मात्र हा अनुभव संगणक विभागाचा मुख्य असताना आला आणि तो ही अगदी अनपेक्षित पणे !
बरीच फोनाफोनी केली पण पोलीस तक्रार करायला कोणीच तयार होईना ! तू केबिन उघडलीस तूच तक्रार कर असे सांगून जो तो कलटी मारू लागला ! शेवटी मी फोन करून पोलीसांना बोलावले. लगेच माझ्या साहेबाचा फोन आला की पोलीस येतील तेव्हा तू तिथे थांबूच नकोस. पुढेचे काय ते पुढे बघू ! मी लगेच जीप पिटाळून शिवडी गाठले. पोलीस वाट बघून कंटाळले व माझ्या अपरोक्षच त्यांनी पंचनामा उरकला. सध्याकाळी ५:३० च्या पुढे मी पोलीस स्टेशन गाठले. मला सोबत म्हणून माझा एक सहकारी तिथे आलेला होताच. गोदीतली शुल्लक चोरी सुद्धा पोलीसांना गंभीरपणे घ्यावीच लागते त्यामुळे ते भलतेच कातावले होते. आल्या आल्या माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती चालू झाली ! मूळात तुमचे तिकडे कामच काय होते हा पहीला प्रश्न ! मी office order त्यांना दाखविली आणि मग ते थंड झाले. मग ते गेट शेवटचे कोणी उघडले, ते मूळात बंद का केले , बंद करतानाच आतले सगळे सामान का नाही हलवले, तिकडे security guard होता का, तुम्हीच तो कोठे शिफ्ट नाही ना केला या प्रश्नांच्या फैरी मी परतवून लावल्या. मग चहापान झाले. रागावू नका हा आमच्या कामाचा भागच आहे अशी मग साखरपेरणी झाली. मग हळूच त्या मालाची किंमत काय आली----( मोठा puase !) असती ? असा बंपर टाकला गेला मी तो खाली वाकून सोडून दिला ! दरम्यान हस्ताक्षर तज्ञ व श्वान पथक बोलावले गेले. ते येई पर्यंत आम्ही पंचनामा फायनल करायला बसलो. पोलीस पंचनामा १०० % मराठीत असतो व black & white Terminal, printer, modem या शब्दांना मराठीत काय म्हणायचे यावर गाडे अडले. शेवटी मी कृष्ण धवल पटल, मुद्रक असे शब्द सूचवून modem मॉडेम असेच लिहा म्हणून सांगितले. आता त्यांना याचे serial number हवे झाले ! ते कसे मिळणार ? त्या साठी ऑफीस तर उघडे पाहीजे. मग ते मागाहून द्यायचे ठरले. मध्येच मला घरची आठवण झाली तेव्हा पोलीस स्टेशन मधूनच फोन करून बायकोल उशीर होणार एवढेच कळवले. थोड्यावेळाने finger print expert आला, आमचा लवाजमा घटनास्थळी गेला. सगळीकडे धूळीचे साम्राज्य असल्यामुळे त्याचा काही फायदा होणार नव्हता. मग आले श्वानपथक ! याची मात्र मला प्रचंड उत्सूकत होती काय भला दांडगा कुत्रा होता तो ! बघून धडकीच भरली आणि विचार आला आपण त्या केबिनकडे गेलो होतो तेव्हा आपल्यावरच त्याने झेप घेतली म्हणजे. पण माझा गैरसमज त्याच्या ट्रेनर ने लगेच दूर केला. कुत्र्याला एखाद्या वस्तूचा वास दिला जातो व तो त्या रोखाने जातो. त्याची साखळी कायमच धरलेली असते. परत सगळे घटनास्थळी आलो. आसपास शोध घेतल्यावर एक फाटका शर्ट सापडला. त्याचा वास त्याला हुंगवण्यात आला. त्या नंतर तो कुत्रा कुंपणाकडे झेपावून भूकू लागला ! पण २० फूट उंच आणि वर तारा असलेल्या कुंपणावरून हातात टर्मिनल घेउन कोण कसे पळणार होते ? पण गर्दूला असेल तर हे सहज करतो हे कळल्यावर ( शिवाय पंख्याची पाती कापली होतीच !)मी थक्कच झालो ! परत सगळे ठाण्यात आलो. पंचनामा फायनल झाला आणि मग त्यांना कळले की दोन तरी पंच हवेत. सहकारी एक बरोबर होता, दूसरा कोण आणणार ? on duty officer ला फोन केला, त्याने लगोलग एक वरीष्ठ सहकारी पाठवुन दिला पण तो सही करेना. माझ्या समोर पंचनामा परत करा मगच सही करणार ! पोलीसानी त्याला दम देउन बघितले पण त्याने एका ACP ची ओळख सांगितल्यावर त्यांचीच तातरली ! शेवटी मी त्याला समजावल्यावर त्याने सही केली व आमची सूटका झाली ! घरी मी १२ वाजता पोचलो !
दूसर्या दिवशी याचा एक अहवाल, पंचनाम्याची प्रत आमच्या Deputy कडे जमा केली. आता खरतर माझे काम संपले होते पण पुढचा सर्व आठवडा पोलीस ठाण्यात बोलवत. तासंतास बसवून ठेवत. शेवटी मी 'येणार नाही' असे निक्षून सांगितल्यावर हा छळ थांबला !
त्या नंतर काही वर्षे मोडली. जुने रेकॉर्ड चाळता चाळता मला एक नोंद सापडली त्यावरून 'ते' सर्व खूप आधी दूसर्या ठीकाणी हलवल्याचे सिद्ध झाले ! म्हणजे चोरी झालीच नव्हती ! अर्थात हे आम्ही कोणत्या तोंडाने पोलीसांना कळवणार ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा