पहीले आव्हान डाटा एन्ट्री बंद करण्याचे !
संगणकीकरण करताना डाटबेस बनविणे हे आव्हानच होते. आयात माल ज्या जहाजाने येतो त्याचे नाव, मालक, एजंट, देश या बरोबरच त्याने आणलेल्या मालाची पूर्ण माहीती जहाज धक्क्याला लागण्यापुर्वीच फीड होणे गरजेचे होते. त्या साठी अनेक मास्टर रेकॉर्डस बनवावे लागले. डाटा एन्ट्री करण्यासाठी माणसे लागणार होती. त्यांना शिकविणे, कामाचे वाटप आणि केलेल्या कामाची पडताळणी हे सर्व काम आमच्या टीमकडे आले. त्या करीता ८ टर्मिनलस व ३० माणसे मिळाली. त्यांना ३ शिफ्ट मधे फिरवावे लागले. रोज सरासरी १००० रेकॉर्डस अपडेट करावे लागायचे. ३० माणसे निव्वळ याच कामाला खर्ची पडत असल्यामुळे जहाजाच्या एजंटकडूनच ही माहीती फ्लॉपी वर घ्यावी असे ठरले. त्या करीत मग फाईल फॉरमँट बनवावा लागला. त्या साठी त्यांच्या बैठका बोलावणे, त्यांना मार्गदर्शन व किरकोळ चूका दूरूस्त करून तो डाटा लोड करणे हे काम मी स्वीकारले. पण काही एजंट सहकार्य करीत काही काही ! जहाज येउन निघून गेले तर फाईलचा पत्ता नसे ! शेवटी डाटा एन्ट्री करायला लागायचीच आणि गोंधळ उडायचा. हीच माहीती कस्टम्सला पण लागायची. मधल्या काळात त्यांनी आम्हाला विचारात न घेताच फाईल फॉरमँट बनवला व सक्तीने तो एजंटच्या गळी मारला. एजंट तक्रार करू लागले की हे कामा डूप्लिकेट होत आहे. तेव्हा आम्ही कस्टम्सचा फॉरमँट स्वीकारला व हा प्रश सोडविला. जसा जसा कामाचा व्याप वाढू लागला तसा तसा माहीती उशीरा देण्याच्या वा अजिबात न देण्याचा फटका बसू लागला. शेवटी मी वरीष्टांना भेटून जो पर्यंत जहाजाची पूर्ण माहीती एजंट देत नाही तो पर्यंत त्याला धक्का न देण्याचे सूचवले ,अन्यथा संगणकीकरणाचा गाडा हलणार नाही हे ठामपणे सांगितले. शेवटी निर्णय झाला व माझ्या सही असेल तरच जहाजांना धक्का मिळू लागला ! याने डाटा एन्ट्री च्या कामापासून कायमची मुक्ती मिळाली व ३० जणांना त्यांच्या विभागात परत पाठविता आले ! माझ्या सही शिवाय जहाजांना धक्का मिळत नाही म्हटल्यावर माझे महत्व एकदम वाढले, सर्व काम सुरळीत चालू लागले व गोदी विभागाच्या संगणक विभागाचे अघोषित नेतेपद आपसूकच चालून आले !
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, २७ जून, २००८
पहीले आव्हान डाटा एन्ट्री बंद करण्याचे !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा