हे असे माझ्याच बाबतीत का बरे घडते ?
अकारावीसाठी पोद्दार मध्ये प्रवेशाच्या रांगेत उभा होतो. ३ तासांनी नंबर आला तेव्हा waiting list चालू झाली होती ! बहुदा सर्वच waiting list मधे मीच पहीला असतो !
माझे waiting list असलेले तिकीट कधीही confirm / RAC होत नाही !
शाळेत कधी चूकूम मुलांना आणायला गेलो तर गणवेष घातलेली सगळी मुले सारखीच दिसतात. त्यात माझी मुले ओळखणे निव्वळ अशक्य होते. तरी बरे मुलेच मला शोधून काढतात !
जेवणाच्या पंक्तीत बसलेलो असतो, बरोबर मध्ये ! दोन्ही टोकाकडून खेकडा भजी किंवा श्रीखंड येत असते. नेमके माझ्या अलीकडे पलीकडे आले की त्या वाढप्यांच्या थाळ्या रीकाम्या होतात. दोघेही दूसरा आणेल म्हणून परत जातात ते जातातच !
तिकीटाला भली-मोठ्ठी रांग असते. मला जरा घाईच असते, मग काय , जातो without ticket.नेमके त्याच दिवशी special checking असते. नेमका पकडला जातोच. कधी पास संपलेला गावीही नसते. तिकीट तपासनीस पास विचारतो, मी तो रूबाबात दाखवितो, तो त्याची तारीख केव्हाच संपली आहे असे सांगून थेट पावतीच फाडायला घेतो !
बेस्टची वाट वघत तासंतास उभा असतो. समोरच्या रस्त्यावर विरूद्ध दिशेच्या त्याच नंबरच्या बस खंडीभर आणि रिकाम्या जात असतात ! मी कंटाळून जेव्हा टॅक्सीत बसतो तेव्हा हवी ती बस अगदी रिकामी येते !
मला फार क्वचितच कार्यालयात निघायला उशीर होतो, पण नेमके त्याच दिवशी ट्रेन अगदी डॉट टाईम सूटते. साहेब पण मस्टर क्लोज करतो, अगदी वेळेवर !
माझ्याच वीजेच्या वापराचे बील सगळ्यात जास्त येते !
माझ्याच स्कूटरची average सगळ्यांत कमी मिळते !
मला जे कोणी भेटतात ते मला फसवणारेच असतात. माझा फायदा करून घेणारे, काम झाले की विसरून जाणारे !
मला जेव्हा जेव्हा Registered पत्र येते तेव्हा आमचे घर बंद असते. पोस्टमनची नोटीस घेउन टपाल खात्यात जावे लागतेच ते आणण्यासाठी, पण पोस्टमन पोस्ट मागायला आलाय आणि घर बंद असे मात्र कधीही होत नाही.
Gurantee / Warantee संपली रे संपली की दूसत्याच दिवशी त्या वस्तू बिघडतात !
टेलर माझे कपडे हमखास उशीरा देतात वर ते बिघडवूनही टाकतात !
मी फेरीवाल्याकडून मोठी हिंमत करून तो १०० रूपये बोलेलेली वस्तू ५० ला घेतो , मग कळते की ती वस्तू खरतर २५ रूपयाचीच आहे.
काहेबाही टाईप करत बसलेला असतो, मस्त मांडणी जमलेली असते, त्या नादात save करायचे राहूनच जाते, आणि जेव्हा करायला जातो तेव्हा नेमका copmputer hang होतो. सगळी मेहनत वाया जाते !
मी जे शेयर खरेदी करतो ते खाली पडायला लागतात, मी ह्ट्टाला पेटून त्यांची average करायचा प्रयत्न करतो, पण घसरण काही संपत नाही. शेवटी माझी क्षमता संपते, मी ते विकून टाकतो व मग मात्र ते रोज upper circuit ला जात राहतात ! शेयर चे काही नाही हो, पण मी जेव्हा जेव्हा electronic goods घेतल्या आहेत, त्याच्या किंमती अगदी दूसर्याच दिवशी खाली आल्या आहेत !
पत्ता शोघून शोधून पार थकून जातो. शेवटी ego सोडून कोणालातरी पता विचारतो, तो आपल्याकडे 'काय येडबंबू आहे' असे बघतो व नुसते बोट दाखवितो, मी त्याच ईमारतीखाली उभे असतो !
आमच्या कडे संगणकीकरण होईपर्यंत माझी वार्षिक वेतनवाढ काढायला आमचा पे-शीट क्लार्क हमखास विसरायचा !
निदान २ लोकांचे प्रत्येकी लाखभर रूपये मी फसवणुकीच्या योजनांत बुडताना वाचवून दिले आहेत, माझे मात्र अशाच एक योजनेत पैसे बुडले ते बुडलेच !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा