--आणि मुंबई बंदर विश्वस्तांच्या सेवेत रुजू झालो !
मी तेव्हा S.Y.B.com ला होतो. कोठ्लीही शिकवणी न लावता first class मिळत होता. C.A. किंवा ICWA करायचे होते. एक मित्र घरी आला नोकरीचा अर्ज घेउन. वडील जिकडे कामाला होते तिथेच भरती होणार होती. कामगारांच्या मुलांसाठी काही जागा होत्या. लेखी परिक्षा मग मुलाखत, कडक वैद्यकिय चाचणी मग निवड अशी भरती प्रक्रीया होती. माझा हा मित्र या आधी ३ वेळा नापास झाला होता. त्याची धारणा होती की जर आपण दोघांनी एकदम फाँर्म भरला तर लेखी परीक्षेत नंबर पाठी-पुढे येतील, माझा पेपर काँपी करून तो पास होउ शकेल ! एरवी मला त्या नोकरीत रस नव्हताच, मित्राच्या प्रेमा पोटी मी अर्ज भरला ! झाले भलतेच ! नंबर आडनावाप्रमाणे काढले गेले आणि आमची फाटाफ़ूट झाली ! दोन महिन्याने निकाल लागला मी गुणवत्ता यादीत चवथा आलो तर तो मित्र परत नापास झाला. पुढे गंमत म्हणून मुलाखत पण दिली आणि नेमणुकीचे पत्र हाती पडले. आमची वैद्यकिय चाचणी लष्करापेक्षाही कडक असते. वजन किमान ५० किलो हवे आणि मी होतो फक्त ४३ किलो ! एकदा medically unfit ठरल्यास नोकरीचे दरवाजे कायमचे बंद झाले असते. घरी चर्चा होउन मी उमेदवारी मागे घ्यायचे ठरवले, तसा रीतसर अर्ज पण दिला.बाबांचे मित्र या निर्णयाने हैराण झाले. आज काल नोकर्या, त्याही सरकारी, मिळत नसताना तुम्हाला हे काय खूळ लागले आहे. तुझा मुलगा शिक्षण तर नोकरी करून सुद्धा पूर्ण करू शकेल, ही कदाचित बंदरातली शेवटची भरती असेल, आलेली संधी लाथाडू नका असे सांगू लागले. बाबांनी आलेली नोकरी सोडू नकोस असे मला वाटते, अंतिम निर्णय तुझा म्हणून सांगितले. तशी घरची परिस्थीती बेताचीच होती. एक बहीण लग्नाची होती, स्वत:चे घर नव्हते, लहान भाउ शिकत होता. मी नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला ! हातात नेमणुकीचे पत्र पडले १७ मार्चला आणि S.Y.B.Com ची परीक्षा सुरू झाली. लेखी विनंती करून नियूक्तीची तारीख २ एप्रिल करून घेतली. वयाच्या १९ व्या वर्षी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सरकारी नोकरीत चिकटलो ! पुढे तीन पाळ्या असलेल्या या नोकरीच्या प्रेमातच पडलो ! माफक पगार, कोणाचेही bossing नाही, file हा प्रकार नाही, 'रात गयी, बात गयी' अशा स्वरूपाचे काम, भरपूर फावला वेळ, सुट्ट्यांची काळजी नाही अशा या नोकरीत रमलो ! Bcom कसाबसा पास झालो, M.com साठी पैसे भरले ते विद्यालयाचे शेवटचे दर्शन ! गिर्यारोहणाचा छंद या नोकरीमुळे लागला, बहुतेक भारत फिरून झाला, अनेक मित्र मिळाले, व्यक्तीमत्वात आमूलाग्र बदल झाला, २५ व्या वर्षी लग्न झाले, साधारण ९२ मधे कोणतीही back ground नसताना संगणक विभागात दाखल झालो. मुंबई बंदरात संगणक संस्कृति रूजवण्यात सिंहाचा वाटा उचलला, नाव कमावले !२००० सालत स्वत:चे २ BHK with teraace घर घेतले !कुटूंबाचा आर्थिक भार उचलू शकलो. बरोबरचे मित्र कोठे आहेत ? काही अजूनही बेकार आहेत. काहींची नुकतीच लग्ने झाली आहेत, काही परदेशात settle झाले आहेत. मी यात कोठे असतो ? who cares ? माझा निर्णय चूकला नक्कीच नाही !
मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शुक्रवार, २७ जून, २००८
आणि मुंबई बंदर विश्वस्तांच्या सेवेत रुजू झालो !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा