समारोप !
सुमारे ३५० वर्षापुर्वी मरगळलेल्या महाराष्ट्राला समर्थाच्या या वाणीने संजीवनी दिली होती.उद्याचा भारत घडविणार्या विद्यार्थ्यांना ती अजूनही मार्गदर्शक ठरू शकते.हा या पुस्तिका कर्त्याचा उद्देश आहे तो सफळ होवो हीच समर्थांचरणी प्रार्थना!
अक्षरश: झपाटल्याप्रमाणे वरील सर्व लिहून पूर्ण केले ! एरवी या कामाला १० दिवस सहज लागले असते ! पण एक अध्याय लिहून झाला की आपसूकच दूसरा पण लिहायला घ्यावा असे होउ लागले ! एकदा लिहीणे म्हणजे तिनदा वाचणे, त्या मूळे माझेही वाचन, मनन होतच होते. आता संपूर्ण दासबोध विकत घेउन, वाचून पूर्ण करायचा आहे !
काही श्लोकांचे / शब्दांचे अर्थ मलाही कळले नाहीत उदा. 'बहुत दिवस राहो नये पिसुणाचेथे ' यातील पिसुणाचेथे चा अर्थ कोणी सांगू शकेल काय ? या श्लोकांचा / शब्दांचा अर्थ याच topic वर विचारावा व जाणकारांनी उत्तरे द्यावीत ही विनंती.
वरील श्लोकात शुद्ध लेखनाच्या काही चूका झाल्या असतील तर कृपया त्या ही निदर्शनास आणाव्यात ही विनंती. समर्थांच्या मराठीचा बाज काही वेगळाच आहे, मराठीतले नेहमीचे शुद्ध लेखनाचे नियम येथे लागू होत नाहीत हे लक्षात ठेउन प्रमाण ग्रंथ आवृत्ती समोर ठेउनच दूरूस्त्या सूचवाव्यात.
नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू
जय जय रघुवीर समर्थ
श्री समर्थ रामदास स्वामींचा अखेरचा संदेश
माझी काया आणि वाणी
गेली म्हणाल अंत:करणी
परी मी आहे जगज्जीवनी
निरंतर १
आत्माराम दासबोध
माझे स्वरूप स्वत:सिद्ध
असता ना करावा खेद
मक्तजनी २
1 टिप्पणी:
राहो नये पिसुणाचेथे म्हणजे राहू नये पिशुनाचे येथे . पिशुन म्हणजे कुत्र्यासारखी हांजी हांजी करणारा लाळघोट्या किंवा असाच काहीतरी अर्थ आहे.
टिप्पणी पोस्ट करा