शनिवार, ९ जुलै, २०११

जीजी र जीजी र जी जी जी !

खास मराठमोळ्या स्त्रीच्याच तोंडी असलेल्या "इश्श" शब्दाचे विविध अर्थ सांगणारा इमेल मला काही वर्षापुर्वी आला होता. हिंदीतला जी हा प्रत्यय सुद्धा अनेक प्रसंगी अनेक अर्थाने वापरला जातो. अर्थात त्याचे उच्चारण मात्र अभिप्रेत असलेल्या अर्थाप्रमाणे करायला हवे.

कोणाच्याही नावाला आदरार्थी जी लावला जातो. जसे एकनाथजी ! अर्थात एखाद्या नालायक माणसाच्या नावाला जी जोडून त्याचा उद्धार सुद्धा करता येतोच !

साहेबाचे बोलणे ऐकत असताना होकार, नकार वा तटस्थता सुद्धा "हां जी" , "ना जी" व "जी जी" अशी व्यक्त करता येते.

कोणाला जाब विचारायचा असेल तर "क्यो जी ?" मधल्या जी चा ई जरा ताणला की झाले.

नवर्याकडून एखादे काम करून घ्यायचे असेल तर "अजी सुनते हो" ला फक्त एक जी जोडा ! नवर्याची काय बिशाद नाही म्हणयाची !

एखाद्याची हांजी हांजी करायची असेल तरी जी हवाच !

एखाद्याला माझ्याशी गाठ आहे असे ठणकवायचे असेच तर "याद रखो जी !" असे सांगता येते.

लटका राग "जाओ ना क्यो सताते हो जी" असा लडीवाळपणे दाखविता येतो.

मस्तीखोर मुलाच्या मागे धावताना "बहुत तंग करते हो जी" असे हिन्दी माँ अनेकवार म्हणते. अर्थात चावटपणा वा वात्रटपणा करणार्याला सुद्धा असे रागे भरता येतेच !

अनेक नात्यांना सुद्धा जी लावून आदरयुक्त दरारा दाखविला जातो , जसे पिताजी, नेताजी, थानेदारजी, ससुरजी, साबजी , सरजी, मामंजी.

एखाद्याची लबाडी उघडी पडल्यावर "अब बचके कहा जाओंगे जी ?" असा जाब त्याला विचारला जातो.


 

    हजेरी घेताना सुद्धा हजर असणारा त्याचे नाव पुकारल्यावर इंग्रजी "येस सर" च्या ऐवजी " जी सर" म्हणू शकतो.

    एखादा विषय समजावून सांगितल्यावर कोणाला काही शंका आहे का असे विचारण्यासाठी "जी ?" चा प्रश्नार्थक उच्चार केला की झाले !

    अनेक हिंदी नव्या-जुन्या गाण्यात जी चा फारच मस्त उपयोग करून घेतलेला आहे जसे, अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना , दिल को लाख संभाला जी, बाबूजी धीरे चलना, एलो जी सनम हम आ गये, दिल तो बच्चा है जी, हम बंजारों की बात मत पुछो जी, हमको जी वो हो गया है रामा रामा, जाओ जी करो ना झुटी बतिया, ए जी ओ जी लो जी सुनो जी, मै हूं मन मौजी करता हूं मै जो वो तुम भी करो जी , लता व किशोर यांनी गायलेल्या "वादा तो निभाया" या गाण्यात सुद्धा जी ने आगळाच गोडवा आणला आहे. अशी अनेक गाणी आहेत ज्यात जी च्या नेमक्या वापराने ती गाणी अवीटा गोड झाली आहेत.

हिन्दीतला जी मराठीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.     मराठमोळ्या पोवाड्यात जी चा वापर वीरश्री चेतविण्यासाठी केला जातो. पोवाड्याचे प्रत्येक कडवे संपले की मोठ्याने "जी (इकार ताणून ), जी जी जी" म्हणताना अंगात कशी वीरश्री संचारते ! मराठी झी चॅनेलने याच " जी जी र जी जी जी" चा वापर आपल्या सिग्नेचर ट्युन साठी छानच करून घेतला आहे !

अच्छा जी ! नमस्तेजी !! फिर मिलेंगेजी !!!


 

    


 


 


 


 

२ टिप्पण्या:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

इश्श! हा शब्द असा लिहितात व म्हणतात हे कोणी सांगितलेले नाहीं काय?

असा हा एक(ची)नाथ ! म्हणाले...

धन्यवाद प्रभाकरजी ! इश्श ! माहित होते हो, कसे लिहायचे ते समजत नव्हते ! जमले, आता मात्र जमले !