- वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिली समभाग खरेदी केली, त्याला वाटते की याला अंमळ उशीरच झाला !
- वृत्तपत्रे घरोघरी पोहचवून मिळालेल्या पैशातून वयाच्या १४ व्या वर्षी त्याने लहान शेत विकत घेतले.
- अजूनही तो ३ शयनगृहे असलेल्या घरात राहतो जे त्याने ५० वर्षापुर्वी लग्न झाले तेव्हा घेतले होते. त्याच्या मते आवश्यक त्या सगळ्या गोष्टी या घरात आहेत. त्याच्या घराला संरक्षक भिंत वा कुंपण सुद्धा नाही.
- सगळीकडे तो स्वत:च गाडी चालवित जातो, त्याने चालक ठेवलेला नाही ना सुरक्षा रक्षकांचा फौजफाटा.
- स्वत: जगातल्या सर्वात मोठ्या खाजगी विमानसेवेचा मालक असलेला हा इसम स्वत: मात्र खाजगी विमानसेवा वापरीत नाही.
- त्याची बर्कशायर हॅथवे ही कंपनी, ६३ कंपन्यांचे नियंत्रण करते. आपल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तो वर्षात एकच पत्र धाडतो व त्यात त्यांना उद्दीष्ट ठरवून देतो. तो त्यांची कधी बैठकही घेत ना्ही किंवा त्यांना साधा फोनही करीत नाही.
- आपल्या सर्व प्रमुखांना त्याने दोनच नियम घालून दिले आहेत १) आपल्या भागधारकांचे नुकसान होईल असे काहीही करू नका २) पहिला नियम कधीही विसरू नका !
- उच्चभ्रू समाजात तो कधी मिसळत नाही. घरी आल्यावर स्वत: बनवलेले पॉप कॉर्न दूरदर्शन बघत फस्त करणे हाच त्याचा वेळ घालवायचा उद्योग !
- हा असामी सेलफोन बाळगत नाही. एवढेच काय त्याच्या टेबलावर संगणक सुद्धा नाही.
- जगातल्या सर्वात धनाढ्य अशा बिल गेटसने अवघ्या पाच वर्षापुर्वी त्याची प्रथमच भेट घेतली. या माणसाशी आपले सुर अजिबात जुळणार नाहीत म्हणून या भेटीसाठी बिल गेटसने फक्त ३० मिनिटे मोकळी ठेवली होती. प्रत्यक्ष भेट मात्र तब्बल १० तास चालली व भेटीनंतर बिल गेटस वॉरेन बफेटचा परम भक्त बनला !
बफेट उवाच –
क्रेडीट कार्डस पासून लांबच रहा, स्वत:तच गुंतवणुक करा आणि या गोष्टी कायम ध्यानात ठेवा,
- पैशासाठी माणूस नाही तर माणसासाठी पैसा आहे.
- जेवढे जमेल तेवढी साधी राहणी अंगिकारा.
- ऐकावे जनाचे , करावे मनाचे.
- नावावर जावू नका, अशा वस्तूच घ्या ज्या तुम्ही सहजपणे वापरू शकाल.
- अनावश्यक खर्च टाळा, अगदी गरजेच्या वस्तूच विकत घ्या.
- आयुष्य तुमचे आहे आणि इतरांना त्यात लुडबुड करू द्यायचे कारणच काय ?
चला तर, साधे आणि सरळ आयुष्य जगूया !
२ टिप्पण्या:
बफेट उवाच –
आणि अशातच गुंतवणूक करा कि ज्याचे आणि ज्यात तुम्हा स्वतःला काही एक ज्ञान आहे.
९० च्या दशकात आय टी चे सगळी कडे प्रचंड वर्चस्व असतांना बफे हा एकमेव असा नावाजलेला धनाढ्य गुंतवणूकदार होता कि ज्याने एकाही आय टी क्षेत्रातील कंपनीचा एकही समभाग कधी विकत घेतला नाही.
पोस्ट आवडली एकनाथजी!
टिप्पणी पोस्ट करा