सोमवार, ११ जुलै, २०११

नित्य पाठाची स्तोत्रे / श्लोक.

कधी काळी दिवेलागणीच्या वेळेला घरातील सर्वांनी एकत्र बसून स्तोत्रे / श्लोक म्हणायची प्रथा होती.
या निमित्ताने घरातले सर्व एकत्र तरी येत. काही चांगले संस्कार यातुन नक्कीच होत होते. मुलांचे पाठांतर, शब्दोच्चार सुधारायला याने निश्चितच मदत होत होती. आजच्या धकाधकीच्या काळात संध्याकाळच हरवून गेली आहे. इच्छा असली तरी संध्याकाळी घरातले सगळे एकत्र जमू शकतीलच असे नाही. बरे मुलांकडून ती म्हणवून पाठ तरी कोण करून घेणार ? आजच्या किती पालकांची स्त्रोत्रे पाठ असतील. आजी किंवा आजोबा सोबत असण्याचे भाग्य किती नातवंडांच्या नशीबी असेल ? जुनी शिक्षण पद्धती घोकंपट्टीवर आधारीत होती ती आता कालबाह्य झाली तेव्हा त्याला पूरक असे हे जुनाट संस्कार तरी का जोपासायचे ? असा ही एक ट्रेंड आहे.

पहाटे, सकाळी किंवा संध्याकाळी ही स्त्रोते सगळ्यांबरोबर म्हणण्यात, ऐकण्यात मात्र एक आगळेच समाधान लाभते हे नक्की. येत नसतील, पाठ नसतील, संस्कृत उच्चार नीट जमत नसतील पण तंत्रामुळे शक्य असेल तर ही स्तोत्रे ऐकायला काय हरकत आहे ? नेटवर धांडोळा घेवून आपल्या म्हणण्यातील, ऐकण्यातील बहुतेक स्त्रोत्रांच्या एम.पी.3 मी संग्रहित केल्या आहेत. आपल्या सर्वासाठी त्याची लिंक देत आहे. आपल्याला एखादे स्तोत्र हवे असल्यास कृपया मला कळवावे, किंवा आपल्याकडे एखाद्या स्तोत्राची एम.पी. 3 असल्यास शेयर करायला हरकत नाही.

मी संग्रहीत केलेली स्तोत्रे / श्लोक खालील प्रमाणॆ –

  • आद्य शंकराचार्य रचित अन्नपूर्णाष्टकम
  • अथर्वशिर्ष
  • मारूति स्तोत्र (सुरेश वाडकर )
  • आद्य शंकराचार्यांचे गणेश भुजंग प्रयाग स्तोत्र
  • गोविंदाष्टकम
  • कनकधारास्तोत्रम
  • करूणाष्टके ( अनुराधा पौडवाल )
  • मनाचे श्लोक (दोन भागात, अनुराधा पौडवाल )
  • आद्य शंकाराचार्यांचे आत्मषटक किंवा निर्वाणाष्टकम
  • राघवाष्टकम
  • रामरक्षा स्तोत्र (पुरूषाच्या आवाजात )
  • रामरक्षा स्तोत्र ( अनुराधा पौडवाल )
  • शटपदीस्तोत्र
  • शिवरूद्र
  • शिव महिम्न स्तोत्र
  • शिव तांडव स्तोत्र (हे चक्क रावणाने रचले आहे ! )


 

सर्व स्तोत्रे एकेक करून उतरवून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

३ टिप्पण्या:

Anand Kale म्हणाले...

तुमच्या सगळ्या पोस्ट वाचतो आणि आवडतात...
मोबाईल वरून वाचत असल्याने प्रतिसाद देता येत नाही.. :(
मला शनि महात्म्य, शनि महिम्न आणि शिवस्तुती (कैलासराणा.....)हवं आहे.. मिळेल का??

अनामित म्हणाले...

This is how it should be done. Unfortunately the renditions are accompanied by a childish collage of images which, to make it more annoying, are constantly moving. It may not be an ocular treat but is definitely an aural treasure.

Purush Sukta: http://www.youtube.com/watch?v=rZAsD9KnWhM

All-women rendition of Purush Suktam: http://www.youtube.com/watch?v=teGKrXWnry8&feature=watch_response

Four lines of naasadeeya sukta (नासदासीन्नो सदासीत्‌ तदानीम्‌) : http://www.youtube.com/watch?v=vBbSbCczYeM

Starting with these links, several other good links can be heard.

- dn

अनामित म्हणाले...

> शटपदीस्तोत्र
>
????? षट्‌पदी

purush sukta is probably an illegal split. It should be purush-sukta, one word. Trying to confirm it with a Sanskrit scholar.