गेले दोन दिवस टीके्ची झोड उठत असलेले व वंशवादी, भारतीयांची टींगल करणारे असा शिक्का बसलेले व्यंगचित्र मी अनेक कोनातुन पाहत आहे. यात आक्षेपार्ह काय आहे हे खरेच मला कळलेले नाही. उलट स्वत:ला "लय शहाणे" समजणार्या लोकांना शहाणपणाचे मार्मिक डोस यातून पाजले गेल आहेत. भारतीय पेहरावात भारतीय दाखविला तर तो अपमान कसा ? इंग्रजांच्या गुलामगिरीने आपण डोक्याचे सोडून कमरेला गुंडाळले व सायबासारखी शर्ट-पॅन्ट टाय घालू लागले हे जरी खरे असले तरी व्यंगचित्रात असे दाखवून भलताच गोंधळ उडला असता. भारतेयाचे कपडे टाप-टीप दाखविले आहेत, त्याला ठीगळे जोडलेली नाहीत. सोबत कृषिप्रधान देशाचे प्रतीक म्हणून गाय दाखविलेली आहे. भारतीय दारावर ठोठवतोय व बड्या धेंडाची झोप उडवतोय. अजीजी करीत नाही आहे, दखल घ्यायला भाग पाडतो आहे. यात भारताचा अपमान करण्याचा कोणताही हेतु मला तरी दिसत नाही ! भारतीयांची व्यंग समजायची कुवत नाही , तरल विनोद समजत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. बाळासाहेब ठाकरे व आर.के. लक्ष्मण सारखे थोर व्यंगचित्रकार याच भुमीतले ना ?
तरी ही न्यूयॉर्क टाइम्सने माफी मागावी याचा अर्थ भारताच्या खर्या-खोट्या रागाची सुद्धा दखल जगाला घ्यायला लागत आहे. हे मात्र स्वागतार्ह आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा