एक दिवसाच्या सामन्यात ३०० वा त्या पेक्षा अधिक धावांचा पाठलाग नक्कीच कठीण असतो. अशावेळी पाठलाग करणार्या संघाच्या फलंदाजांची कसोटी लागत असते. अगदी पहिल्या चेंडूपासून चेंडूस धाव या गतीने धाव फटकावण्याचे आव्हान दडपण वाढवणारेच असते व अशा वेळी मिळवलेला विजय नक्कीच काबिले-तारीफ असतो.
या अभ्यासासाठी माहिती अधिक विश्वासार्ह असावी म्हणून ज्या संघानी निदान १०० पेक्षा जास्त वेळा धावांचा पाठलाग केला आहे तेच संघ निवडले आहेत. तक्ता खाली दिलेला आहे.
Team | No. of Times Field First | Need to chase 300+ | % to Total matches fielding First | Won | Lost | Tied | W/L | W/L % |
India | 390 | 40 | 10.26 | 9 | 31 | 0 | 0.29 | 29 |
Sri Lanka | 306 | 38 | 12.42 | 5 | 33 | 0 | 0.15 | 15 |
Bangladesh | 122 | 32 | 26.23 | 1 | 31 | 0 | 0.03 | 3 |
Zimbabwe | 184 | 31 | 16.85 | 0 | 31 | 0 | 0 | 0 |
Pakistan | 344 | 31 | 9.01 | 4 | 27 | 0 | 0.14 | 15 |
New Zealand | 284 | 26 | 9.15 | 4 | 21 | 1 | 0.19 | 19 |
West Indies | 353 | 19 | 5.38 | 1 | 18 | 0 | 0.05 | 6 |
England | 278 | 17 | 6.12 | 2 | 14 | 1 | 0.14 | 14 |
Australia | 334 | 14 | 4.19 | 3 | 11 | 0 | 0.27 | 27 |
South Africa | 231 | 13 | 5.63 | 3 | 10 | 0 | 0.3 | 30 |
Total | 2826 | 261 | 9.24 | 32 |
|
|
| 12 |
प्रथम क्षेत्ररक्षण करताना एकूण २८२६ सामन्यात २६१ वेळा ३०० वा त्या पेक्षा जास्त लक्षाचा पाठलाग करण्याचे लक्ष्य संघाना मिळाले व त्यात ते फक्त ३२ वेळा या अवघड आव्हानाचा यशस्वी पाठलाग करू शकले तर दोन वेळा सामना बरोबरीत सूटला. म्हणजे अशा स्थितीत विजयाची सरासरी शक्यता फक्त १२ % आहे.
अर्थात जेव्हा ३०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष तुम्हाला मिळते तेव्हा तुमची गोलंदाजी वा क्षेत्ररक्षण दुबळे असल्याचेच ते एक लक्षण असते. असे आव्हान मिळायची सरासरी टक्केवारी ९ आहे. सर्वात जास्त वेळा ही पाळी आली आहे. बांगलादेशवर , १२२ पैकी ३२ सामन्यात ( २६ %), त्या खालोखाल झिम्बाब्वे ( १८४, ३१, १७), श्रीलंका ( ३०६, ३८, १२) व भारत (३९०, ४०, १० ). या संघाची गोलंदाजी व/वा क्षेत्ररक्षण दुबळे आहे हेच ही आकडेवारी सिद्ध करते. या उलट भेदक गोलंदाजी असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आहे , ३३४ पैकी फक्त १४ वेळा ( ४.१९ %) प्रतिस्पर्धी संघ ३०० पेक्षा अधिक धावांचे आव्हान उभे करू शकला आहे !
भारताने सर्वात जास्त वेळा ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला आहे, ४० पैकी ९ वेळा, त्या खालोखाल पाठलागात यशस्वी ठरलेला संघ आहे श्रीलंकेचा , ३८ पैकी ५ वेळा. दुबळ्या बांगलादेशाला एकूण ३२ वेळा ३००+ धावांचे आव्हान मिळाले पण त्याचा यशस्वी पाठलाग त्यांना फक्त एकदाच करता आला आहे . झिम्बाबेला ३१ वेळा असा पाठलाग करायचा होता पण ते यशस्वी एकदाही ठरले नाहीत !
अशा परिस्थितीत विजयाची टक्केवारी सगळ्यात जास्त द. आफ्रिकेची आहे ( ३० %), त्या खालोखाल आहे भारत (२९ %) व ऑस्ट्रेलिया (२७ % ) अशी आहे. सर्वात मोठ्या लक्षाचा यशस्वी पाठलाग द. आफ्रिकेनेच ऑसीजच्या विरूद्ध केला आहे ( ४२४ धावा )
आकडीवारी एरवी अनेकवेळा फसवी असते पण या बाबतीत मात्र ती "दूध का दूध पानी का पानी" अशीच आहे ! बलवान संघ व दुबळ्या संघातला फरक अगदी स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे !
1 टिप्पणी:
cool,
I was looking for this info from long time :)
thanks and keep writing...
टिप्पणी पोस्ट करा