गुरुवार, ११ ऑगस्ट, २०११

फलंदाजाची कसोटी पाहणारा चवथा डाव !

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाचा खरा कस लागतो चवथ्या डावात फलंदाजी करताना. चवथ्या डावात खेळताना एकतर सामना वाचवायचा तरी असतो किंवा जिंकायचा तरी असतो. करा अथवा मरा ( निदान पळून तरी जा !) अशीच स्थिती असते. कसोटी मध्ये चवथ्या डावात खेळताना ज्यांनी एकूण कारकिर्दीत हजारच्या वर धावा केल्या आहेत अशा खेळाडूंचाच विचार केला तर कोण कसाला उतरला ते लगेच समजेल.

  • आकडेवारीवरून दिसते की बॉयकॉटची सरासरी सर्वांधिक आहे. ३६ सामन्यात, ३४ वेळा चवथी पाळी खेळताना त्याने १३ वेळा नाबाद राहून १२३४ धावा ५८.७६ च्या सरासरीने केल्या आहेत .त्यात त्याची ३ शतके व ७ अर्धशतके आहेत.
  • सुनील गावस्करने बॉयकॉटपेक्षा दोन सामने व १ डाव कमी खेळूनही ९ वेळा नाबाद रहात १३९८ धावा करताना ४ शतके ( त्यात एक द्विशतक ) व ८ अर्धशतके झळकावली आहेत.
  • चवथ्या डावात खेळताना एकूण हजारच्या वर धावा करणारे १८ खेळाडू आहेत पण त्यात फक्त सुनील व ग्रीनिजलाच द्विशतक ठोकता आले आहे.
  • राहुल द्रविडने सगळ्यात जास्त धावा काढल्या आहेत , १४७६, त्याच्या मागे आहे लारा , १४४० धावा !
  • सरासरीत सगळ्यात सरस आहेत अनुक्रमे बॉयकॉट, गावस्कर, पॉंटींग, ग्रीनीज, स्मिथ. सचिन या क्रमवारीत १५ व्या स्थानी आहे. त्याची चवथ्या डावातली सरासरी ३९ एवढीच आहे. सचिनची कसोटी कारकिर्दीतली सरासरी ५५ आहे तेव्हा हा फरक लक्षणीयच आहे.
  • धावांचा धबधबा म्हणून नावाजलेला लारा सुद्धा या निकषात खूपच खाली आहे. त्याची सरासरी आहे फक्त ३७ आणि त्यातही तो तब्बल ७ वेळा भोपळाही फोडू शकलेला नाही. द्रविड मात्र चवथ्या डावात एकदाही शून्यावर बाद झालेला नाही !
  • सरासरीत १५ व्या स्थानी असलेला सचिन ६५ सामन्यात ५२ वेळा चवथ्या डावात खेळलेला आहे , १४३९ धावा जमविताना त्याने ३ शतके व ३ अर्धशतके केलेली आहेत व ३ वेळा शून्यावर बाद झालेला आहे. सरासरीत त्याच्या खाली असलेले सरवान, लारा व स्टुअर्ट अनुक्रमे ३६, ४६, ३९ च डाव खेळलेले आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे.
  • या यादीत स्थान असलेले बहुतेक फलंदाज सलामीला अथवा मधल्या फळीत खेळणारे आहेत व जॅक कॅलिस व गेलचा अपवाद सोडल्यास निव्वळ फलंदाज आहेत.


     

    आकडेवारीसाठी आधार : espncricinfo.com

३ टिप्पण्या:

संकेत म्हणाले...

I am fan of your blog. I frequently read your articles thanks to marathiblogs.net. I found them interesting and genuine all the times. But this time, I found a mistake. Wasim Jaafar had got a double century in playing against West Indies in West Indies tour. The match was a draw, but he showed a great nerve playing that inning. I am not sure, but mostly this match was played on the 2005 WI tour under Rahul Dravid's Captaincy. Please make check and make it sure.

sudeepmirza म्हणाले...

quite interesting!!

असा हा एक(ची)नाथ ! म्हणाले...

Dear Sudip,

My criteria was "those who have scored more than 1000 runs (total ) batting in 4th inning.

I checked again and found that in the history of Test Cricket, only 5 have scored a double century, playing in 4th inning, namely GA Headley, NJ AStle, SM Gavaskar, WJ Edrich and CG Greenidge.

So Wasim haven't even scored a double century in 4th inning.