सुरेश भट यांच्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” ही कविता महा-नौटंक्या बोलबचन अमिताभ बचनच्या तोंडून भ्रष्ट स्वरूपात ऐकण्याचे दुर्भाग्य लाभल्यानंतर या कवितेचे विडंबन सूचले ते असे
लाभले आम्हास भाग्य लाभला मराठी
जाहलो खरेच धन्य शेजारी मराठी
भाषा, प्रांत, देश एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय सोडतो मराठी - १
आमुच्या मुजोरीपुढे वाकते मराठी
आमुच्या पैशापुढे झुकते मराठी
आमुच्या मतांसाठी लपते मराठी
आमुच्या संस्कृतिने लाजते मराठी - २
आमुच्या पोराबाळांनी लाथाडली मराठी
आमुच्या आमदारांनी तुडविली मराठी
आमुच्या जातभाईंनी नागविली मराठी
आमुच्या बच्चनजींनी बाटविली मराठी - ३
कोणाच्या मनामनात दंगते हिन्दी
कोणाच्या रगारगात रंगते कानडी
कोणाच्या उराउरात स्पंदते विंग्रजी
कोणाच्या नसानसात नाचते बंगाली
कोणाच्या बरे बोलण्यात येते मराठी - ४
येथल्या रीक्षावाल्याची भाषा हिन्दी
येथल्या पदपथावर बागडते बंगाली
येथल्या झोपड्यातील भांडणे कानडी
येथल्या दूकानावर नेमप्लेट इंग्रजी - ५
येथल्या राजकारणात चालते सोनियाजी
येथल्या मंत्रिपदांवर बसतो अबु आझमी
येथल्या कमिशनरपदी असतो शर्माजी
येथल्या मराठींचे नेतेच करतात हां जी - ६
येथल्या शहाराशहरातुन युपी-बिहारी
येथल्या झोपड्यातुनी बेकायदा बंगाली
येथल्या मोहल्ल्यात राहतात पाकिस्तानी
येथल्या उद्योगातले अधिकारी अमराठी
येथल्या कचेर्यातला शिपाई मात्र मराठी - ७
उपरे असेच असंख्य पोसणार मराठी
आपल्याच घरी हाल सोसणार मराठी
हे असेच चालणार म्हणते मराठी
शेवटी मान टाकणार माय मराठी - ८
५ टिप्पण्या:
>> शेवटी मान टाकणार माय मराठी - ८
तरीही मान टाकणार नाय मराठी - ८
सर्व आमुच्या आणि येथल्या शब्दांना "च" लावला तर अधिक उपरोधिक होईल.. म्हणजे कशी लवंगी मिरची सारखी... :-)
तरीही मला अभिमान आहे मराठीचा
या विडंबनला आपण सर्व कुठेतरी कारणीभूत आहोत असे नाही वाटत का ?
या विडंबनला आपण सर्व कुठेतरी कारणीभूत आहोत असे नाही वाटत का ?
या विडंबनला आपण सर्व कुठेतरी कारणीभूत आहोत असे नाही वाटत का ?
टिप्पणी पोस्ट करा