कोणे एके काळी मराठी सिनेमा म्हणजे तमाशापट हे समीकरणच बनले होते. पब्लिकने ’बंद करा हा तमाशा’ असे बजावूनही तुणतुणे चालूच होते. शेवटी मायवाप प्रेक्षकांनीच शिणुमाकडे पाठ फ़िरवली व मराठी सिनेमाला घरघर लागली. करमाफ़ी योजना सरकारने आणली पण मराठी माणूस मात्र माफ़ि द्यायला तयार नव्हता. गेल्या पाच-एक वर्षात मात्र मराठी सिनेमाने कात टाकली आहे. बंद पडलेला श्वास चालू झाला आहे. नव्या दमाचे निर्माते, दिगदर्शक , कलाकार, खाजगी वाहिन्यांची गुंतवणुक, जागी झालेली मराठी अस्मिता या मुळे पुन्हा मराठी सिनेमा प्रकाशझोतात आला आहे. अनेक नवे विषय मराठीत हाताळले जात आहेत व मराठी सिनेमातील प्रयोगाची दखल राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे.
दोन-एक वर्षापुर्वी मित्राने मला एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सांगते ऐका, सवाल माझा ऐका या चार मराठी तमाशापटांच्या ( प्रदर्शन काल साधारणे पणे ५० च्या दशकातील असावा )वीसीडी दिल्या होत्या, त्याला त्या राइट करून हव्या होत्या. असली कामे मी अगदी उत्साहाने करतो ! पण नंतर त्याने मला त्यातली फ़क्त गाणीच वेगळी राइट करून द्यायची गळ घातली. गुगलमधून सर्च करून त्या साठी योग्य आणि चकटफ़ू असलेले सॉफ़्टवेयर मी शोधून काढले व उद्योगाला लागलो. तमाशा हा माझ्या आवडीचा विषय केव्हाच नव्हता पण ही गाणी वेगळी करताना मला ती ऐकणे भागच पडले व नकळत तमाशाच्या प्रेमातच पडलो. त्या दिवशी रात्री दोन पर्यंत जागुन त्यातली बहुतेक गाणी मी पाहिली व तबियत खुष झाली !
ब्लॅक आणि व्हाइट ची एक वेगळीच जादू असते. त्या काळी सिनेफ़ोटोग्राफ़ीचे तंत्र अगदीच बाल्यावस्थेत असताना एवढे सुरेख छायाचित्रण व ध्वनिमुद्रण करणार्या तंत्रज्ञांना मनसे दाद ! तमाशाचे चित्रण करताना तंत्रावरील हुकमत सतत जाणवते. तिकिटबारीवरची लगबग, सुरवातीचे नमन, तमासणींचे नृत्यकौशल्य , विविध वाद्ये वाजविणार्यांच्या लकबी, सोंगाड्याची लुडबुड, पब्लिकची गावरान दाद, शिट्या, पाटलाचा रूबाब – या सर्व गोष्टी अगदी बारकाईसह टीपल्या गेल्या आहेत. कलाकारात जयश्री गडकर, माया जाधव, लिना गांधी, अरूण सरनाइक, गणपत पाटील , चंद्रकांत, सुर्यकांत बंधू खरेच .. काय बाप कलाकार होते ! भूमिकेत अगदी झोकून द्यायचे ! तमाशा त्यांनी पडद्यावर अगदी जिवंत केला होता. मी वर उल्लेख केलेले चारही चित्रपटांनी तमाशापटाचा सुवर्णकाळ आणला असणार यात शंकाच नाही. मला वाटते शांतारामबापूंचा पिंजरा हा शेवटचा तमाशापट असावा व त्यानंतर तमाशापटाला उतरती कळा लागली, त्यानंतर मराठीत आलेला तमाशा प्रधान चित्रपट मला तरी आठवत नाही. हे चित्रपट बघताना मात्र खरेच त्या काळात गेल्याचा फ़िल येतो व तमाशापटांनी बराच काळ तरी मराठी माणसाचे भाव-विश्व कसे व्यापून टाकले होते त्याचा प्रत्यय येतो.
हे सर्व मराठीचे वैभव / तमाशा युग युट्युबच्या माध्यमातुन सगळ्या दोस्तांबरोबर शेयर करायची मुराद आता पुर्ण होत आहे. दर्दींनी या गाण्यांचा चित्रपट कोणता, (अर्थात वरील चार पैकीच असणार तो ) , गीतकार, संगीतकार, प्रकाशन काल यावर प्रकाश टाकल्यास तो सुद्धा अपडेट केला जाइल. लावण्यात सुद्धा खडी लावणी, बैठकिची लावणी, सवाल जबाब, कलगी-तुरा हे सर्व प्रकार हाताळले गेले आहेत. त्याचा गावरान बाज सांभाळून ! अर्थात यात सगळ्याच लावण्या नाहीत, काही पारंपारिक गीते सुद्धा आहेत पण ती सुद्धा अवीट गोडीची आहेत.
गाण्याचा मुखडा आणि खाली दुवा दिलेला आहे.
वि.सूचना :- हे सर्वच चित्रपट निदान ५० वर्षापुर्वीचे आहेत. त्यांच्या गाण्यांच्या स्वामित्व हक्काबद्दल मला काहिही माहिती नाही. ही गाणी शेयर करण्यात माझा कोणताही व्यापारी हेतू नाही. कोणाकडे याचे स्वामित्व हक्क असल्यास आणि तसे कळवल्यास ही गाणी ताबडतोब उडवली जातील. तसेही ही गाणी दाखवणे म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासारखेच आहे. गाणी बघून लोकांना हे चित्रपट बघायची इच्छा होईलच !
आली आली फ़ळवाली आली हो
http://www.youtube.com/watch?v=uCjak0GNcQoदोन-एक वर्षापुर्वी मित्राने मला एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सांगते ऐका, सवाल माझा ऐका या चार मराठी तमाशापटांच्या ( प्रदर्शन काल साधारणे पणे ५० च्या दशकातील असावा )वीसीडी दिल्या होत्या, त्याला त्या राइट करून हव्या होत्या. असली कामे मी अगदी उत्साहाने करतो ! पण नंतर त्याने मला त्यातली फ़क्त गाणीच वेगळी राइट करून द्यायची गळ घातली. गुगलमधून सर्च करून त्या साठी योग्य आणि चकटफ़ू असलेले सॉफ़्टवेयर मी शोधून काढले व उद्योगाला लागलो. तमाशा हा माझ्या आवडीचा विषय केव्हाच नव्हता पण ही गाणी वेगळी करताना मला ती ऐकणे भागच पडले व नकळत तमाशाच्या प्रेमातच पडलो. त्या दिवशी रात्री दोन पर्यंत जागुन त्यातली बहुतेक गाणी मी पाहिली व तबियत खुष झाली !
ब्लॅक आणि व्हाइट ची एक वेगळीच जादू असते. त्या काळी सिनेफ़ोटोग्राफ़ीचे तंत्र अगदीच बाल्यावस्थेत असताना एवढे सुरेख छायाचित्रण व ध्वनिमुद्रण करणार्या तंत्रज्ञांना मनसे दाद ! तमाशाचे चित्रण करताना तंत्रावरील हुकमत सतत जाणवते. तिकिटबारीवरची लगबग, सुरवातीचे नमन, तमासणींचे नृत्यकौशल्य , विविध वाद्ये वाजविणार्यांच्या लकबी, सोंगाड्याची लुडबुड, पब्लिकची गावरान दाद, शिट्या, पाटलाचा रूबाब – या सर्व गोष्टी अगदी बारकाईसह टीपल्या गेल्या आहेत. कलाकारात जयश्री गडकर, माया जाधव, लिना गांधी, अरूण सरनाइक, गणपत पाटील , चंद्रकांत, सुर्यकांत बंधू खरेच .. काय बाप कलाकार होते ! भूमिकेत अगदी झोकून द्यायचे ! तमाशा त्यांनी पडद्यावर अगदी जिवंत केला होता. मी वर उल्लेख केलेले चारही चित्रपटांनी तमाशापटाचा सुवर्णकाळ आणला असणार यात शंकाच नाही. मला वाटते शांतारामबापूंचा पिंजरा हा शेवटचा तमाशापट असावा व त्यानंतर तमाशापटाला उतरती कळा लागली, त्यानंतर मराठीत आलेला तमाशा प्रधान चित्रपट मला तरी आठवत नाही. हे चित्रपट बघताना मात्र खरेच त्या काळात गेल्याचा फ़िल येतो व तमाशापटांनी बराच काळ तरी मराठी माणसाचे भाव-विश्व कसे व्यापून टाकले होते त्याचा प्रत्यय येतो.
हे सर्व मराठीचे वैभव / तमाशा युग युट्युबच्या माध्यमातुन सगळ्या दोस्तांबरोबर शेयर करायची मुराद आता पुर्ण होत आहे. दर्दींनी या गाण्यांचा चित्रपट कोणता, (अर्थात वरील चार पैकीच असणार तो ) , गीतकार, संगीतकार, प्रकाशन काल यावर प्रकाश टाकल्यास तो सुद्धा अपडेट केला जाइल. लावण्यात सुद्धा खडी लावणी, बैठकिची लावणी, सवाल जबाब, कलगी-तुरा हे सर्व प्रकार हाताळले गेले आहेत. त्याचा गावरान बाज सांभाळून ! अर्थात यात सगळ्याच लावण्या नाहीत, काही पारंपारिक गीते सुद्धा आहेत पण ती सुद्धा अवीट गोडीची आहेत.
गाण्याचा मुखडा आणि खाली दुवा दिलेला आहे.
वि.सूचना :- हे सर्वच चित्रपट निदान ५० वर्षापुर्वीचे आहेत. त्यांच्या गाण्यांच्या स्वामित्व हक्काबद्दल मला काहिही माहिती नाही. ही गाणी शेयर करण्यात माझा कोणताही व्यापारी हेतू नाही. कोणाकडे याचे स्वामित्व हक्क असल्यास आणि तसे कळवल्यास ही गाणी ताबडतोब उडवली जातील. तसेही ही गाणी दाखवणे म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासारखेच आहे. गाणी बघून लोकांना हे चित्रपट बघायची इच्छा होईलच !
आली आली फ़ळवाली आली हो
राम राम पाव्हण तुम्ही नाव सांगा ..
http://www.youtube.com/watch?v=R8GkB21LxVM
राजसा घ्यावा गोविंद विडा
http://www.youtube.com/watch?v=C6Ks2tRkGvE
चंद्र आणि प्रीतीचे
http://www.youtube.com/watch?v=vlxc3GnmWOA
बुगडी माझी सांडली ग
http://www.youtube.com/watch?v=d6s9JjfmE_U
दिलवरा दिल माझे ओळखा
http://www.youtube.com/watch?v=EJTyaxQBbRw
ऐका ऐका गोष्ट
http://www.youtube.com/watch?v=-zW0nZ8ElDI
इष्काचा इंगा
http://www.youtube.com/watch?v=cKAUbjMeK4Q
सांगा या वेडीला
http://www.youtube.com/watch?v=idFWzTZ2wII
सोळाव वरीस धोक्याचे
http://www.youtube.com/watch?v=EU_pY12ajCk
मला वसंतसेना दिसली
http://www.youtube.com/watch?v=PsF82OKk1ys
तु देवांचा देव
http://www.youtube.com/watch?v=WRKd8XgpKpg
आल्या नाचत नाचत मेनका रंभा
http://www.youtube.com/watch?v=lwr6YHQ55wc
नाचतो डोंबारी
http://www.youtube.com/watch?v=EegDwhcZ4v0
आता लग्नाच वय माझे झाले ग
http://www.youtube.com/watch?v=jXo9vpKpTp4
कशी गौळण राधा बावरली
http://www.youtube.com/watch?v=T3X0-LqDsdI
छुमक छुम नाचे नाचे नर्तकी
http://www.youtube.com/watch?v=l0yoAm0zNDk
लाखामधून सख्या तुम्हाला
http://www.youtube.com/watch?v=bMusIa9aQQM
अशी मी खिडकित राहते उभी
http://www.youtube.com/watch?v=RbjH8qBb2io
काल रात सारी मजसि झोप नाही आली
http://www.youtube.com/watch?v=QUaN4VCsQ1o
झाली भली पहाट
http://www.youtube.com/watch?v=_cSw7xQolpI
आम्ही निघालो रे बाजारा
http://www.youtube.com/watch?v=VCd6utrdNS8
२ टिप्पण्या:
काका,
एव्हडी सगळी गाणी एका ठिकाणी मिळाल्यामुळे खूप खुश झालोय.
धन्यवाद
अनिकेत वैद्य.
Sundarabai grew up as a Lavni singer, but she later tried to move away from the romantic or hedonistic angle prevalent in the genre to introspective and religious treatment. So successful was her attempt that Bal Gandharva became her admirer and requested her to compose music for Ekach Pyala. Famous names like Annasaheb Mainkar and Dhamman Khan used to accompany her on table; both of them later made a name as music composer.
Sundarabai's music on 78 rpm discs is not easy to find but it exists. HMV had included her stirring recital of 'वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला' (closely fashioned after the tune of 'परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला') in a compilation. It is not a Lavni (which was Sundrabai's forte) but still a great sample of her genius.
टिप्पणी पोस्ट करा