194 वरती डाव सोडला --- !
सचिनचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झालेले आहे. पाकिस्तानातील मुलतान कसोटीत सचिन 194 धावांवर असताना, तेव्हा कप्तान असलेल्या द्रविडने डाव सोडला होता . याची संतप्त प्रतिक्रीया भारतात उमटली होती तर काहींनी संघाच्या हितासाठी घेतलेला धाडसी निर्णय असे त्याचे स्वागत केले होते. सचिनने आपली नाराजी तेव्हाही लपविली नव्हती पण नक्की काय घडले हे मात्र गुलदस्त्यातच होते. सचिनच्या या डावा दरम्यान प्रवीण आमर दोनदा निरोप घेवून आलेला सगळ्यानीच बघितले होते. डाव घोषित करताना गांगुली सुद्धा हजर होता व त्या वरून अनेक तर्क लढविले जात होते. सचिनने आपल्या आत्मचरित्रात या सर्व प्रकरणाचा विस्तृत उहापोह केलेला आहे. राहुल द्रविड हा किती कोत्या मनाचा खेळाडू आहे हेच यातून दिसून येते. झाले ते असे --
सामन्याच्या दूसर्या दिवशी सेहवागने 300 धावा केल्या होत्या. सचिनने शतक केले होते व नाबाद होता. चहापानाच्या बैठकीत 15 षटकांचा खेळ बाकी असताना डाव सोडायचे ठरले होते. चहापानानंतर थोड्याच वेळात प्रवीण आमरने निरोप आणला की धावांचा वेग वाढवा, डाव सोडायचा आहे. सचिनने यावर आमरेला सांगितले की क्षेत्ररक्षण पांगलेले असल्याने एकेरी धावाच मिळत आहेत पण डाव केव्हा सोडायचा हे बैठकीत ठरलेले आहे, आम्ही तसेच खेळतो आहोत. थोड्या वेळाने परत निरोप आला की पुढच्याच षटकात डाव सोडण्यात येणार आहे. सचिनला त्या षटकातला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. पाचव्या चेंडूवर युवराज बाद झाल्यावर द्रविडने डाव घोषित केला व सचिनला व्दिशतकापासून वंचित ठेवले. अर्थातच सचिन तेव्हा भडकला होता पण त्याने याची जाहिर वाच्यता केली नाही. दोन दिवसांनी द्रविड सचिनची नाराजी दूर करायला आला व संघाच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगू लागला. तेव्हा सचिनने त्याला सांगितले की बैठकित ठरल्याप्रमाणे अजून एक षटक बाकी होते तेव्हा डाव सोडायचे काहीही कारण नव्हते. तसेही अजून एक षटक डाव लांबला असता तरी काही बिघडणार नव्हते ( भारताने हा सामना 1 डाव व 52 धावांनी जिंकला होता !). काही महिन्यापुर्वी सिडनीत द्रविड 91 वर असताना गांगुलीने डाव घोषित केला होता व त्याचा डूख मनात ठेवून द्रविडने हे कृत्य केले होते ! पण तेव्हा सामन्याचा चवथा दिवस होता, आघाडी 400+ होती व तेव्हा जिंकल्यास भारताला सामना व मालिका जिंकायची सुवर्णसंधी होती. तेव्हा गांगुलीने तिनदा निरोप धाडूनही द्रविड शतकासाठीच खेळत होता व त्याचा जोडीदार तेव्हा सचिनच होता ! गोलंदाजाना पुरेसा वेळ मिळावा म्हणून डाव सोडणे गरजेचे होते पण द्रविडला फक्त आपले शतक दिसत होते ! अर्थात हा सामना ऑस्ट्रेलियाने अनिर्णीत राखला ! सचिनने ही सगळी स्थिती समजावून दिल्यावरही राहुल आपल्या निर्णयाचे समर्थनच करत होता ! सचिनला तो असेही म्हणाला की तू अजूनही व्दिशतक करू शकतोस. या वर सचिनचे उत्तर होते की हो पण सुरवात 1 पासून करायला लागेल, 194 पासून नाही ! याच दरम्यान समालोचक असलेला संजय मांजरेकर द्रविडची कड घेत होता तेव्हा सचिनने त्यालाही झापले होते, पुढे संजय मांजरेकर सचिनच्या विरोधात बोलू लागला त्याचे हेच कारण असावे !
२ टिप्पण्या:
आज आपल्या शंकेचे निरसन करायचा यत्न करणार आहे.
१९४ म्हणजे इंग्रजीतले आद्याक्षरे AID. त्यात १ आणि ४ ह्या अंकांमध्ये ९ हा रामकारक अंक आहे. ती संख्या जराही बदलली असती तरी तो डाव सोडला गेला नसता. म्हणजे एकाऐवजी जीन धावा काढल्याने किंवा चौक्याऐवजी छक्का मारल्याने ती धावसंख्या जर १९४ ऐवजी १९७ किंवा १९६ झाली असती तरी सचिनला त्याचे शतक पूर्ण करायची संधी दिली गेली असती. हा एक वेगळा दृष्टीकोन आहे. क्प्तानाला शिव्या देणे खूप सोपे असते, त्या पचवणे चे महान कार्य कधितरी करायचे असते.
आपल्या लेखाविषयी विस्ताराने वैचारिक टीका टिप्पणी येथे केली गेली आहे. त्यावरून एखाद्या नाण्याची दुसरी बाजू देखिल काय असते ह्याविषयीची मत मांडणी थोडीफार दिसू शकते असा आमचा ग्रह आहे.
टिप्पणी पोस्ट करा