रामाने रावणाचा वध केल्यावर ’मरणांतानि वैराणी’ असे म्हणत स्वत: रावणाला विधिवत अग्नी दिला होता. हा आदर्श भारतात अजूनही पाळला जातो. स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला पण त्याच्या कबरीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा दिली. कारगिल युद्धात मेलेल्या पाकच्या सैनिकांचे भारतीय जवानांनी सन्मानाने दफन केले, अगदी याच पाकड्यांनी आपल्या सैनिकांच्या मृतदेहांची मेल्यानंतरही विटंबना केलेली असतानाही ! न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी परागंदा झालेले हुसेन लंडनमध्येच पैगंबरवासी झाले म्हणून भारतीय वृतपत्रांनी मोठाच मातम केला आहे ! त्यांनी लंडनमध्ये पलायन केले याला जणू सगळे हिंदूच जबाबदार या आवेशात सगळ्या पेपरवाल्यांनी गळा काढला आहे.
महाराष्ट्रातील पंढरपूर येथे जन्मलेले चित्रकार एम.एफ. हुसेन लंडनमध्ये पैगंबरवासी झाले. भारतात उदंड पैसा, प्रसिद्धी कमावलेले हुसेन लंडनमध्ये कशाला गेले होते ? हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढल्याबद्दल त्यांच्यावर भारतात न्यायालयात खटले चालू होते. त्यात त्यांना शिक्षा होणार होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांना जर एवढा पुळका होता तर आपली ही भूमिका त्यांना न्यायालयात ठामपणे मांडता आली असती. जिकडे कसाबचे ऐकले जाते तिकडे हुसेनचे सुद्धा ऐकले गेले असतेच ! पण भ्याड हुसेन यांनी आधी दुबईत मग इंग्लंडमध्ये पलायन करणे पसंत केले. आता वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी मृत्यू येणे तसे स्वाभाविकच आहे आणि तो जिकडे असाल तिकडेच येणार. यमदूत काही देशांच्या सीमा पाळायला बांधील नाहीत. हुसेन यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावाच मुळात खोटारडा होता. हिंदू देव देवतांची नग्न चित्रे त्यांनी रेखाटलीच पण त्याही पुढे जावून त्यांनी भारतमातेच्याच वस्त्राला हात घातला. या वेळी मात्र भडका उडाला व हुसेन यांचे हात त्यात पोळले, तोंड दाखविणे त्यांना मुष्किल झाले. त्यांनी या प्रकाराची माफी मागितली तेव्हाच हिंदू देव-देवतांना विकृत स्वरूपात रेखाटल्याबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता. पण तसे मात्र त्यांनी केले नाही ! हिंदूच्या देव देवतांना नग्न रेखाटणारा हुसेन यांचा कुंचला इतर धर्मातल्या विभूति रेखाटताना मात्र भलताचा सोज्वळ असे. हुसेन यांची आई लहानपणीच गेली होती व अखेरपर्यंत ते आपल्या आईच्या कबरीचा शोध घेत होते. आईचे रेखाटन करताना हे असले थेर हुसेन यांना का सुचले नाहीत ? तेव्हा हिंदूना दुखविणे, त्यांच्या श्रद्धा स्थानांना ठेच पोचविणे व यातुन अधर्मी मिडीयाचा वापर करून स्वत:ची तुंबडी भरणे हेच हुसेन यांचे खरे स्वरूप होते. जिकडे आपण नाव कमाविले तिकडेच मरण येणे हे भाग्यलक्षण असले तरी ते भाग्य हुसेन यांनी स्वत:च लाथाडले होते. दोष त्यांच्या कर्माचाच आहे. देशद्रोहाचा आरोप माथ्यावर मिरवत परागंदा असलेला दावूद सुद्धा केव्हातरी मरणारच आहे, तो उद्या पाकमध्ये किंवा दुबईत मेला म्हणून भारतीय मिडीया असाच मातम करणार आहे का ?
झाले ते झाले ! हुसेन मेले ,वैर संपले, आता खुषाल त्यांचे थडगे पंढरपूरमध्ये बांधा पण कफन म्हणून भारतमातेच्या वस्त्राला हात घालू नका म्हणजे झाले !
८ टिप्पण्या:
"मरणानंतर वैर पण संपते"... असे लिहीले की बॅलन्स शिट टॅली होतो..
तेवढी एन्ट्री पुढच्या फिस्कल मध्ये सुधारून घ्या म्हणजे झालं...
khuopach chhan
chaan lihile aahes
chaah lihile aahes
मस्तच !!!
'पण' लेखकाला इथे वेगळेच सुचवायचे आहे असे हा लेख वाचल्यावर समजते.शीर्षकाच्या त्या शेवटात येणाऱ्या पण मध्ये तुम्ही म्हणता तो लेखाचा अर्थ मुळातच लेखकाला अभिप्रेत नाहीये असे दिसते."शिमगा सरला, तरी कवित्व उरते" असे लेखकाचे म्हणणे आहे.त्या मुळे एकनाथराव आम्ही बरोबर समजतोय ना ? तुम्हालाही हाच अभिप्रेत आहे ना ?
तो मुसलमान होता. मुसलमान काय चीज असते हे माहित करुन घेन्या साठी प्रत्येक गैर्मुसलमानाने ह्या साईट्स मन लावुन पुर्न लिन्कस वाचाव्यात.
http://www.historyofjihad.org/fitna.html
http://www.myspear.org/
http://islamisbad.com/
अिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने खडे फोडणाऱ्या या माणसाने मुसलमानानी आक्षेप घेतल्यावर आपला एक सिनेमा प्रदर्शित केला नाही.
टिप्पणी पोस्ट करा