मंगळवार, १ जुलै, २००८

उत्तम गुण अभ्यासिता येती

उत्तम गुण अभ्यासिता येती--
वाट पुसिल्याविण जाउ नये फळ वोळखिल्याविण खाउ नये
पडिली वस्तु घेउ नये येकायेकी अति वाद करू नये पोटी कपट धरू नये
शोधिल्याविण करू नये कुळहीन कांता
विचारेविण बोलो नये विवंचनेविण चालो नये
मर्यादेविण हालो नये काही येक
वक्त्यास खोदू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्याअभ्यास सोडू नये काही केल्या
अति क्रोध करू नये जोवलगांस खेदू नये
मनी वीट मानू नये सिकवणेचा
क्षणाक्षणा रूसो नये लटिका पुरूषार्थ बोलो नये
केल्याविण सांगो नये आपला पराक्रमु
बोलिला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चूको नये केल्याविण निखंदू नये पुढिलांसी कदा
आळसे सुख मानू नये चाहाडी मनास आणू नये
शोधिल्याविण करू नये कार्य काही
सुखा आंग देउ नये प्रेत्न पुरूषे सांडू नये
कष्ट करिता त्रासो नये निरंतर
कोणाचा उपकर घेउअ नये घेतला तरी राखो नये
परपीडा करू नये विस्वासघात
बहुत अन्न खाउ नये बहुत निद्रा करू नये
बहुत दिवस रहो नये पिसुणाचेथे
धूम्रपान घेउ नये उन्मत्त द्रव्य सेउ नये
बहुचकासी करू नये मैत्री कदा
तोंडी सीवी असो नये दुसर्यास देखोन हांसो नये
उअणे अंगी संचारो नये कुळवंताचे
देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होउअ नये
जिवलगांसी करू नये कळह कदा
अलाधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये
मर्यादेविण चालो नये पवित्र जनी
सभा देखोन गळो नये समई उत्तर टळो नये
धि:कारिता चळोप नये धारिष्ट आपुले
सत्यमार्ग सांडू नये असत्य पंथे जाउअ नये
कदा अभिमान घेउ नये असत्याचा
अपकीर्ती ते सांडावी सदकीर्ती वाढवावी
विवेके दृढ धरावी वाट सत्याची
पोटी चिंता धरू नये कष्टे खेद मानू नये
समी धीर सांडू नये काही केल्या
अपमानित सिणो नये निखंदिता कष्टो नये
धि:कारिता झुरो नये काही केल्या
नित्यनेम सांदू नये अभ्यास बुडो देउ नये
परतंत्र होउ नये काही केल्या
परोपकार सांडू नये परपीडा करू नये
विकल्प पडो देउ नये कोणीयकासी
बहुसाल बोलो नये अबोलणे कामा नये बहुत अन्न खाउ नये उपवास खोटा
बहुसाल निजो नये बहुत निद्रा मोडू नये
बहु नेम धरू नये बाश्कळ खोटे
बहुजनी असो नये बहु आरण्य सेउ नये
बहुदेह पाळू नये आत्महत्या खोटी
उत्तम गुण स्वये ते बहुतांस सांगावे
वर्तल्याविण बोलावे ते शब्द मिथ्या
उत्तम गुणी श्रृंघारला ज्ञानवैराग्ये शोभला
तोचि येक जाणावा भला भूमंडळी
जंवरी चंदन झिजेना तंव तो सुगंध कळेना
चंदन आणि वृक्ष नाना सगट होती
जनीजनार्दन वोळला तरी काय उणे तयाला
राजी राखावे सकळांला कठीण आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: