मंगळवार, १ जुलै, २००८

अवगुण सोडीता जाती

अवगुण सोडीता जाती
सकळ अवगुणामधे अवगुण आपले अवगुण वाटती गुण
मोठे पाप करंटपण चुकेना की
आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती
सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख
अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी
जो बहुतांचा वैरी तो येक मूर्ख
बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन
परस्थळी बहु भोजन करी तो ये मूर्ख
घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे
शब्द बोलता निर्बुजे तो येक मूर्ख
आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट
सिकवणेचा मानी वीट तो येक मूर्ख
स्वये नेणे परोपकार उपकाराचा अनोपकार
करी थोडे बोले फार तो येक मूर्ख
दंत चक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण
सर्वकाळ जयाचे मळीण तो येक मूर्ख
जिवलगांस परम खेदी सुखाचा शब्द तोहि नेदी
नीच जनांस वंदी तो येक मूर्ख
परपीडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दु:ख
गेले वस्तूचा करी शोक तो येक मूर्ख
अल्प अन्याय शमा न करी सर्वकाळ धारकी धरी
जो विस्वासघात करी तो येक मूर्ख
आपले काज होये तंतरी बहुसाल नम्रता धरी
पुढीलांचे कार्य न करी तो येक मूर्ख
दोष ठेवी पुढिलांसी तेचि स्वये आपणापासी
ऐसे कळेना जयासी तो येक पढतमूर्ख
मागे येक पुढे येक ऐसा जयाचा दंडक
बोले येक करी येक तो येक पढतमूर्ख
रात्रंदिवस करी श्रवण न सांडी आपले अवगुण
स्वहित आपले आपण नेणे तो येक पढतमूर्ख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: