मंगळवार, १ जुलै, २००८

आत्मविश्वास हवा -- धैर्य हवे -- प्रयत्न हवेत.

आत्मविश्वास हवा -- धैर्य हवे -- प्रयत्न हवेत.
धीर धरा धीर धरा तकवा हडबडू गडबडू नका
काळ देखोनि वर्तावे साडावे भय पोटिचे
धरावा धीर तो मोठा विचारे पाहता बरे
अधीर माणसे खोटी काम काही कळेचिना
जो दुसर्यावरी विशवासला त्याचा कार्यभाग बुडाला
जो आपणचि कष्टत गेला तोचि भला
रेखा तितुकी पुसोन जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते
डोळे झाकणी करावी ते काये निमित्य
बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमाने बुडाले
मुख्य निश्चये चुकले प्रत्ययाचा
उदंडाचे उदंड ऐकावे परि ते प्रत्यये पाहावे
खरे खोटे निवडावे अंतर्यामी
घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड
तेथे कैचे आणिले व्दाड करंटपण
आधी कष्ट मग फळ कष्टचि नाही ते निर्फळ
साक्षेपेविण केवळ वृथापृष्ट
जो दूसर्याचे अंतर जाण देश काळ प्रसंग जाणे
तया पुरूषा काय उणे भूमंडळी
अचुक येत्न करवेना म्हणौन केले ते सजेना
आपला अवगुण जाणवेना काही केल्या
यत्नाचा लोक भाग्याचा यत्नेविण दरिद्रता
उमजला लोक तो धाला उमजेना तो हपापला
भाग्यासी काय उणे रे यत्नांवाचूनि राहिले
यत्न तो करावा कैसा हेचि आधी कळेचिना
मुख्य यत्न विचाराचा त्यावरी बोलणे बरे
चालणे सत्य नेमाचे नीतिन्याय चुको नये
बुद्धीने सर्वही होते बुद्धीदाता नारायणु
आधी तो आपला कीजे लक्षुमी चरणी वसे
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे
यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे
अचूक यत्न तो देवो चुकणे दैत्य जाणिजे
न्याय तो देव जाणावा अन्याय राक्षसी क्रीया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: