मंगळवार, १ जुलै, २००८

श्री समर्थांचा मुलांना उपदेश

श्री समर्थांचा मुलांना उपदेश

बरे सत्य बोला यथातथ्य चाला

बहू मानिती लोक येणे तुम्हाला

धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो

बरा गुण तो अंतरामाजि राहो

दिसामाजी काही तरी रे लिहावे

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे

बरे बोलणे सत्य जीवी धरावे

बहू खेळ खोटा सदालस्य खोटा

समस्तांसि भांडेल तोचि करंटा

बहुता जनांलागि जीवी भजावे

भल्यासंगती न्याय तेथे भजावे

भला रे भला बोलती ते करावे

बहुता जनांचे मुखे येश घ्यावे

परी शेवटी सर्व सोडोनी द्यावे

मरावे परी कीर्तिरूपे उरावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: