सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

मराठी द्वेषाची गरळ ओकणार्या संजय निरूपमच्या पेकाटात लाथ घाला !

गेली अनेक दशके परप्रांतिय रोजी-रोटीसाठी मुंबईत, महाराष्ट्रात येत आहेत. या प्रदेशाचे लचके तोडत आहेत. एकही फ़ूटपाथ, मैदाने, मोकळी जागा यांच्या आक्रमणातुन सूटलेली नाही. यांचे व्यवसाय कायदेशीर नाहीत. जे काही करायचे ते कायदे तोडूनच असाच त्यांचा खाक्या ! प्रांत-भाषा भेदाच्या पलिकडे गेलेले आपले (?) शेक्युलर नेते मतपेटीवर डोळा ठेउन त्यांची बेकायदा बांधकामे १९८५, ९०, ९५, २००० आणि आता २००५ अशी कायदेशीर करत चालले आहेत. तुमच्या माझ्यासारखा आयुष्यभर घराचे हप्ते फ़ेडत झीजत-झीजत मरतो पण या परप्रांतियांना फ़ूकट घरे दिली जात आहेत. त्यात पण त्यांचा माज एवढा की आम्हाला अमूक एवढ्या फ़ूटाचीच घरे हवीत असे ते सरकारच्या छाताडावर बसून सांगतात व सरकार पण ते गुमान मान्य करते. गुजराती-मारवाडी निदान भांडी घासायला, दूकानात नोकर म्हणून तरी मराठी माणसे ठेवतात. यांचे मात्र १०० % आउटसोर्सिंग, युपी-बिहार मधून ! गुजराती-मारवाड्यांनी इथे काहीतरी सामाजिक कामे केली, शाळा, रूग्णालये, बगिचे उभारले, यांनी मात्र इथे नुसती गु-घाण केली, नाले तुंबवले, मुंबई बुडवली, इकडे कमावलेला प्रत्येक पैसा युपी-बिहारला पाठवला ! मुंबईवरून कधीकाळी मराठी-गुजराती भांडले असतील, पण तो आता इतिहास झाला ! आज मराठी टक्का अवघा २० पण भरणार नाही, गुजराती-मारवाडी जेमेतेम तेवढेच असतील पण युपी-बिहारी मात्र ३० ते ४० % आहेत. दक्षिणेतल्या अनेक राज्यांनी आर्थिक विकासामार्फ़त आपल्याच राज्यात रोजगार निर्मिती करून आपल्या प्रांतातुन जाणारे लोंढे थांबवले आहेत, उलट आज हजारोंच्या संख्येने मराठी संगणक अभियंते बंगलोर, हैदराबादला स्थायिक झाले आहेत. युपी-बिहार मात्र बकाल-भकास झाला आहे आणि तिथली जनता महाराष्ट्राचेच लचके तोडायला येत आहे. गझनीच्या आक्रमणापेक्षाही हे भयंकर आक्रमण आहे !

परवा मात्र संयमाचा कडेलोट व्हावा असेच घडले. शिवसेनेतुन फ़ुटून बाहेर पडलेला दळभद्री संजय निरूपम काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईतुन निवडून आला आहे. विधानसभेचे जागा वाटप अंतिम स्वरूप घेत असतानाच याने गरळ ओकली आहे. तो म्हणतो की मुंबईत आम्ही ४० % आहोत , तेव्हा त्या प्रमाणात आम्हाला जागा मिळायलाच हव्यात ! गरीब-बापुडे म्हणून एखाद्या प्रदेशात लाचार होउन जायचे, तिकडे आधी आपले बस्तान बसवायचे, कोपराने खणून म़उ लागते असे दिसताच आपला कुटंब कबिला बोलवायचा, मग सगे-सोयरे गोळा करायचे, इथेल एकूण एक नियम पायदळी तुडवायचे, कोणी विरोधी आवाज काढला की आधी रडगाणे गायचे, मग घटनेतले १३ वे कलम दाखवायचे आणि मग दादागिरी चालू करायची ! आज यांना ४० % जागा हव्यात, उद्या मुख्यमंत्री पद मागतिल, परवा मराठीला दुय्यम भाषा ठरवून हिंदीला मखरात बसवतील, तेरवा महाराष्ट्राच्या बजेट मधून युपी-बिहारमधल्या पुतळ्यांसाठी अनुदान मागतील ! मुंबईसह महाराष्ट्र युपी-बिहारची बटीक व्हायला मग कितीसा वेळ लागेल ? शेवटी मुंबई केंद्रशासित करून युपी-बिहारसह महाराष्ट्राचे द्वैभाषिक सुद्धा होईल !

या बनारसी पानाच्या पिचकारीचे शिंतोडे उद्धव, राज यांच्यावरच नाही तर मुंढे-गडकरी, विलासराव, अशोकराव, आबा व दिल्लीत थेट सुशीलकुमार व ग्रेट मराठा सरदार शरद पवारांच्या अंगावर उडाले असतील . शिंतोड्याची एक गंमत असते. कोठे-कोठे ? मला तर काहीच दिसत नाही ! असे म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते नाहीतर पिचकारी मारणार्याचे थोबाड फ़ोडावे लागते, पेकाटात लाथ घालावी लागते ! पहिले खूपच सोपे आहे, दूसर्यासाठी मात्र हिंमत लागते ! स्वत:ला ग्रेट मराठा समजणार्यांच्यात ती आहे का ? मला तर वाटले होते की सर्व मराठी राजकारणी या एकाच मुद्दयावर पक्षभेद विसरून एकत्र येतील. संजय निरूपमच्या पेकाटात लाथ घालतील. आपली औकात ओळख म्हणून कान हग्या दम भरतील, सत्तेतला स जरी परत काढलात, वाटा मागितलात तर लोटासुद्धा ठेउन घेउन, गांडीवर लाथ मारून जिकडून आलात तिकडे हाकलू अशी एकमुखी तंबी देतील ! पण यातले काहीही झाले नाही. सगळे कसे शांत शांत !! सत्ता सुंदरीचे स्वप्न बघत सगळ्यांनीच पहाट झोपेचे सोंग घतलेले ! सत्तेसाठी लाचार झालेल्या माणसांकडून अर्थातच ही अपेक्षा नाही. तशी धरणे म्हणजे हिजड्याकडून अपत्याची अपेक्षा करण्यासारखेच आहे ! पण ज्यांनी मराठी माणसाच्या नावाने हातात शिवधनुष्य घेतले आहे त्यांची थोबाडे बंद का ? मराठीचे वेगळे दूकान उघडणार्यांनी सुद्धा तोंडात तोबरे धरले का बरे धरले आहेत ?

मला राजकारणातले काही समजत नाही पण एवढे मात्र कळते की हा एकमेव मुद्दा जर कोणी मराठीवादी मांडेल तरी प्रचंड बहुमत मिळवेल . शिवसेनेने भाजपाशी युती खुषाल तोडावी व या एकमेव मुद्दयाचे भांडवल करून सत्तेचा सोपान चढावा एवढी या मुद्दयात ताकद आहे. स्वत: राज हा एकमेव मुद्दा घेउन निवडणुकित उतरला तरी बहुमत मिळवू शकेल ! एक जळता निखारा सर्व मराठी-प्रेमींच्या हाती या मराठी द्वेषाची गरळ ओकणार्याने दिला आहे. हा निखारा सत्तेच्या लालसेपायी विझू द्यायचा की त्याच्यावर फ़ूंकर मारून त्याच्या आगीत मराठी द्वेष्ट्यांची होळी पेटवायची हा निर्णय मराठी राजकारण्यांनी घ्यायचा आहे. राजकारणी काही करोत न करोत, माझ्या तमाम मराठी बांधवानो, एकच कळकळीची विनंती, या निवडणुकित १०० % मतदान करा व ते सुद्धा मराठी माणसालाच. अगदी २८८ आमदार मराठीच निवडून आले पाहिजेत. मराठी या एकाच मुद्दयावर एकत्र या ! मराठी उमेदवारालाच मत द्या. लचके तोडून वाटा मागणार्यांना युपी-बिहारची वाटच दाखवा ! आपल्याच नादानपणामुळे ही विषवल्ली आपण पोसली, तिला खतपाणी घातले. आज ती आपल्याच नरडीचा घोट घेण्याएवढी फ़ोफ़ावली आहे, माजली आहे. तिला आत्ताच समूळ उखडा, ही अखेरची संधी आहे असे समजूनच कृती करा !

जय महाराष्ट्र !

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Tumche manahane yogya. Pan ek gosht
Lakshat Ghya. Mahastracha nirman 1960 sali zala Tya adhich anek gujarati ani marvadi sadhya jo maharastra ahe tyat hote. Manhun te anya prantache ahaet ha gairsamaz dur kara. Mumabai ani maharastracha aarthik udhar karnychya Gujarti ani Marvadi mansala Shrey jato. Ani te soda. Jar thumi manhanta ki UP,Bihar kinva anya prantache lok Mumbai madhe yeu nay he agadi chukiche. KAran mumbait Central Government kadun dar vashi hazaro koti rupaye development sathi yetat. Central government kadun yenara paisa tumahala hava jo poorn rastrachya Tax collection madun yeto pan tumahala anya Prantatil Lok navhet. Jitke thumi UP,BIhar chya Lokana Mumbaitun baher kadnyasathi oradta ahet,titke jar Bagladeshiyana kadnyasathi kele aste tar rastrache bhale zale aaste. Dhanyavad!

साळसूद पाचोळा म्हणाले...

मस्तच ... अगदी बिनदिक्त आनी स्पष्ट लिहले आहे... .

मी हि आवाहन करतो की फक्त आणि फक्त मराठी उअमेदवारांनाच मत द्या...

PrasadG म्हणाले...

हे लिखाण वाटून मी ही लिंक माझ्या फेसबुकच्या खात्याला जोडली आहे. :)

धन्यवाद.

प्रसाद

Addddddyyyyyyyy म्हणाले...

I guess सध्या कृति ला जास्त importance दिला गेला पाहिजे ........लिखणाने समाज पेटतो पण पेटलेल्या समाजाला एक headstart ची गरज आहे.
लेखन आणि भाषण इतकेच वर्तन देखिल बदलासाठी अपरिहार्य आहे........