सोमवार, २५ मार्च, २०१३

पहिल्या डावात 400 पेक्षा जास्त धावा करूनही पराभव !


नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑसीजना चारी मुंड्या चीत केले. तिसर्या कसोटीत मोहालीला ऑसीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 408 धावा केल्या होत्या तरीही हा सामना त्यांना गमवावा लागला. या सामन्यानंतर माझे कुतुहल जागे झाले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा कदाचित पहिलाच प्रसंग असेल किंवा असे प्रसंग फारच  कमी असतील असे मला वाटत होते. डाव घोषित करून अथवा फॉलो-ऑन देवून पराभूत होणे जसे विरळा तसेच हा प्रकार मला वाटला होता. खात्री पटविण्यासाठी espncricinfo.com ची मदत घेतली व मिळालेली माहिती धक्कादायक होती. असे तब्बल 39 वेळा घडले आहे. (त्यातही नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारताना पहिल्या डावात 400 पेक्षा जास्त धावा करूनही संघ हरल्याचे 34 वेळा घडले आहे ! आपल्या हाताने पायावर कुर्‍हाड मारून घेणे !  )
पहिल्या डावात   (1894 सालात ) ऑसीजनी 586 धावांचा डोंगर उभा करूनही इंग्लंडने त्यांना खडे चारले होते. हा सामना 6 दिवस चालला होता ! त्या खालोखाल भारताने ऑसीजच्या पहिल्या डावातल्या 556 धावांना तोडीस तोड उत्तर दिले होते. ( 500 पेक्षा अधिक धावा करूनही संघांना तब्बल 6 वेळा पराभव चाखावा लागला आहे.) अशी नामुष्की ऑसीजवर 13 वेळा ओढवली असली तरी त्यांनी 12 वेळा अशा वेळ त्यांच्यावर आली तेव्हा विजयही खेचून आणला आहे. भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याला असे फक्त 3 वेळा हरावे लागले आहे तर 8 वेळा अशा प्रसंगात आपण खचून न जाता विजयश्री खेचून आणली आहे व त्यात ही हा पराक्रम आपण चारदा जगातल्या बलाढ्य समजल्या जाणार्या ऑस्ट्रेलियन संघाशी दोन होत करताना गाजविला आहे ! कोण म्हणतो भारतीय कचखाऊ आहेत ?

Team Batting First
1st innings Score
Lost Against
Ground
Match  Date
Australia
586
v England
Sydney
14 Dec 1894
Australia
556
v India
Adelaide
12-Dec-03
England
551
v Australia
Adelaide
1-Dec-06
West Indies
526
v England
Port of Spain
14-Mar-68
Australia
520
v South Africa
Melbourne
6-Feb-53
England
519
v Australia
Melbourne
8-Mar-29
England
496
v Australia
Leeds
22-Jul-48
Australia
490
v West Indies
Bridgetown
26-Mar-99
South Africa
484
v England
The Oval
4-Sep-03
Australia
478
v India
Bangalore
9-Oct-10
South Africa
451
v Australia
Sydney
2-Jan-06
West Indies
449
v Australia
Bridgetown
7-Apr-12
West Indies
448
v Sri Lanka
Galle
13-Nov-01
Australia
447
v England
Leeds
16-Aug-01
Australia
445
v India
Kolkata
11-Mar-01
England
445
v Sri Lanka
The Oval
27-Aug-98
Australia
435
v England
Sydney
23-Feb-33
New Zealand
433
v Australia
Christchurch
10-Mar-05
Australia
429
v West Indies
Bridgetown
30-Mar-84
Australia
428
v India
Mohali
1-Oct-10
Bangladesh
427
v Australia
Fatullah
9-Apr-06
England
425
v Australia
Lord's
27-Jun-30
Sri Lanka
425
v India
Colombo (PSS)
3-Aug-10
India
424
v Australia
Bangalore
25-Mar-98
Zimbabwe
422
v India
Delhi
18-Nov-00
Bangladesh
419
v England
Dhaka
20-Mar-10
Australia
414
v England
Melbourne
1 Mar 1895
India
414
v South Africa
Cape Town
2-Jan-07
Zimbabwe
412
v Pakistan
Bulawayo
1-Sep-11
New Zealand
409
v England
Leeds
3-Jun-04
Australia
408
v India
Mohali
14-Mar-13
Pakistan
408
v West Indies
Georgetown
13-Mar-58
England
405
v Australia
The Oval
16-Aug-30
West Indies
405
v Australia
Adelaide
25-Nov-05
Pakistan
405
v England
Karachi
7-Dec-00
India
402
v Australia
Perth
16-Dec-77
Australia
401
v England
Leeds
16-Jul-81
Sri Lanka
400
v England
Cardiff
26-May-11
Bangladesh
400
v India
Dhaka
10-Nov-00

1 टिप्पणी:

साईड अंपायर म्हणाले...

क्रिकेट आणि बेसबाँल मधला सर्वात मोठा फरक हा तंबाखू खाऊन ग्राउंडवर पचापच थुंकण्याचा मैदानावरील दृष्यमान अभाव....