सोमवार, २० डिसेंबर, २०१०

मूल्य !

तुम्हाला तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठावूक आहे का ?

व्यक्तीमत्व विकासाच्या एका वर्गाची सुरवातच नाट्यमय झाली. भाषण देणार्या त्या प्रसिद्ध वक्त्याने खिषातुन 500 रूपयाची नोट काढून उपस्थित सर्वापुढे फडफडवली व ही नोट कोणाला हवी आहे असे विचारले. अर्थात सगळ्यानीच हात वर केले. मग त्या वक्त्याने ती नोट हातात घेवून पार चुरगळून टाकली व परत तोच प्रश्न विचारला. आताही सगळ्यांचे हात वरच झाले. चेहर्यावर आश्चर्य दाखवित आता त्या वक्त्याने ती नोट बूटाने चूरडली, तिच्यावर उड्या मारल्या. आता त्या नोटेची अवस्था बघवत नव्हती ! “आता तरी ही नोट घेणारे कोणी असेल का ?” या त्याच्या प्रश्नाला सगळ्यांनीच हात उंचावून तयारी दाखविली !

वक्ता हसत हसत सगळ्यांना म्हणाला की तुम्ही आताच एक अतिशय मौल्यवान धडा शिकलात ! 500 ची नोट मी हाताने चुरगळली, बूटाने लाथाडली तरी ती पाचेशेची नोटच राहते, तिचे मूल्य जराही कमी होत नाही. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपल्यावर अनेक संकटे येतात, आपण कोलमडतो, अपयशाचे फटकारे खातो, आपणच घेतलेले अनेक निर्णय आपल्यालाच गोत्यात आणतात, मग आपण स्वत:लाच दोष देतो, आपण बिनकामाचे आहोत, आपली काही किंमतच नाही, लायकी नाही असे आपल्याला वाटते. पण काहीही झाले तरी तुमचे मूल्य केव्हाही कमी झालेले नसते, होणारही नाही हे पक्के लक्षात ठेवा !

तुम्ही खास असामी आहात हे कधीही विसरू नका ! भूतकाळातल्या अपयशाची सावली तुमच्या उज्वल भविष्यावर कधीही पडू देवू नका !

“VALUE HAS A VALUE ONLY IF ITS VALUE IS VALUED”

४ टिप्पण्या:

Seema Tillu म्हणाले...

लेख आवडला. सततच्या अपयशामुळे किंवा आपल्याला हवे तसे न घडल्यामुळे, किंवा मनासारख्या गोष्टी न होण्यामुळे आपल्याला काहीच जमत नाही, आपली लायकीच नाही असे वाटत राहाते. तेव्हा असे धीर देणारे शब्द काही करण्याची उमेद देतात.

Shridhar Atre म्हणाले...

khup chhan vichar. manala navin disha ani ubahri denare.
Dhanywad. asech nav navin vichar mandat raha.

Shridhar